भातकुली नगरपंचायतच्या स्वीकृत नगरसेवकपदी पुरुषोत्तम खर्चान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 22:25 IST2018-07-31T22:25:19+5:302018-07-31T22:25:54+5:30
स्थानिक नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकाच्या दोनपैकी एका रिक्त जागेची निवडणूक प्रक्रिया ३१ जुलै रोजी पार पडली. यामध्ये युवा स्वाभिमानचे पुरुषोत्तम खर्चान यांची अविरोध निवड झाली. युवा स्वाभिमान पार्टीचे अध्यक्ष आमदार रवि राणा यांनी भातकुली येथील युवा सामाजिक कार्यकर्ता पुरुषोत्तम खर्चान यांच्यावर नावावर एकमत केले. त्यानुसार मंगळवारी नगरपंचायतीतील सर्व नगरसेवकांनी अविरोध निवड केली.

भातकुली नगरपंचायतच्या स्वीकृत नगरसेवकपदी पुरुषोत्तम खर्चान
ठळक मुद्देअविरोध निवड : युवा स्वाभिमानचा झेंडा
लोकमत
न्यूज नेटवर्कभातकुली : स्थानिक नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकाच्या दोनपैकी एका रिक्त जागेची निवडणूक प्रक्रिया ३१ जुलै रोजी पार पडली. यामध्ये युवा स्वाभिमानचे पुरुषोत्तम खर्चान यांची अविरोध निवड झाली.
युवा स्वाभिमान पार्टीचे अध्यक्ष आमदार रवि राणा यांनी भातकुली येथील युवा सामाजिक कार्यकर्ता पुरुषोत्तम खर्चान यांच्यावर नावावर एकमत केले. त्यानुसार मंगळवारी नगरपंचायतीतील सर्व नगरसेवकांनी अविरोध निवड केली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भातकुलीचे तहसीलदार अजितकुमार येळे व सहायक म्हणून भातकुली नगरपंचायत मुख्याधिकारी शेळके यांनी पाहिले. युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी विजय जल्लोष साजरा केला. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.