पूर्णानगरच्या विद्यार्थ्यांची नवोदयसाठी निवड
By Admin | Updated: July 2, 2015 00:16 IST2015-07-02T00:16:03+5:302015-07-02T00:16:03+5:30
स्थानिक भगवंतराव कळसकर विद्यालयाचे वर्ग इयत्ता पाचवीचे विद्यार्थी अथर्व राजेन्द्र नागापुरे, कृष्णा सुरेश दंडे व रोशन कैलास काळे ...

पूर्णानगरच्या विद्यार्थ्यांची नवोदयसाठी निवड
पुर्णानगर : स्थानिक भगवंतराव कळसकर विद्यालयाचे वर्ग इयत्ता पाचवीचे विद्यार्थी अथर्व राजेन्द्र नागापुरे, कृष्णा सुरेश दंडे व रोशन कैलास काळे आणि जनता हायस्कूलच्या शशांक चंद्रकांत दिनोदे यांची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झालेली आहे. गुणवान विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आर.बी. कळसकर, मधुसुदन कळसकर, मुख्याध्यापक के.एन. सोनार, जनता हायस्कूलचे मुख्याध्यापक चारथळ आदींनी कौतुक केले आहे. कळसकर व जनता हायस्कूलच्या अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.