पुणे गरीब रथ, मुंबई अंबा एक्स्प्रेसची आतुरतेने प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:37 IST2021-01-08T04:37:28+5:302021-01-08T04:37:28+5:30
मुंबई, अहमदाबाद, पुणे, चैन्नई, तिरूपती, आदी मार्गावर रेल्वे गाड्या सुरू झाल्या आहेत. तसेच २२ जोडी फेस्टिव्हल गाड्यांना ३१ ...

पुणे गरीब रथ, मुंबई अंबा एक्स्प्रेसची आतुरतेने प्रतीक्षा
मुंबई, अहमदाबाद, पुणे, चैन्नई, तिरूपती, आदी मार्गावर रेल्वे गाड्या सुरू झाल्या आहेत. तसेच २२ जोडी फेस्टिव्हल गाड्यांना ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विशेष अथवा फेस्टिव्हल रेल्वे गाड्यांनी प्रवास महागडा ठरत असल्याने आता नियमित गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे. आरक्षण तिकीट शिवाय प्रवास नाही, अशी नवी नियमावली आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारी नागपूर-पुणे गरीब रथ आणि अमरावती- मुंबई अंबा एक्स्प्रेस तत्काळ सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. अमरावती-मुंबई एक्स्प्रेस भुसावळ मध्य रेल्वे विभागात सर्वाधिक उत्पन्न देणारी गाडी असताना ती का सुरू होत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. अंबा एक्स्प्रेस सुरू करण्यासाठी खा. नवनीत राणा यांनी रेल्वे बोर्डाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी अमरावतीकरांची आहे.
--------------------------
भुसावळ डीआरएम आज दौऱ्यावर
मध्य रेल्वे भुसावळ विभागाचे प्रबंधक विवेक गुप्ता हे आज, मंगळवारी, ५ फेब्रुवारी रोजी बडनेरा, अमरावती
रेल्वे स्थानकाच्या पाहणीसाठी येत असल्याची माहिती आहे. डीआरएम गुप्ता यांचा हा दौरा नियमित असून,
कोल्हापूर- गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेसने बडनेरा रेल्वे स्थानकावर पाेहोचणार आहे. रेल्वे स्थानकाची पाहणी करून ते परत जातील, असे रेल्वे सूत्रांनी सांगितले.