ग्रामीण क्षेत्रात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:22 IST2021-02-05T05:22:35+5:302021-02-05T05:22:35+5:30
भातकुली : जिल्ह्यात ग्रामीण क्षेत्रात पल्स पोलिओ लसीकरणचा शुभारंभ वलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषद सदस्य सदस्य तथा रुग्ण ...

ग्रामीण क्षेत्रात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम
भातकुली : जिल्ह्यात ग्रामीण क्षेत्रात पल्स पोलिओ लसीकरणचा शुभारंभ वलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषद सदस्य सदस्य तथा रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष गजानन राठोड यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य लक्ष्मण सोळुंके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप रणमले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विनोद करंजेकर, वैद्यकीय अधिकारी गणेश पाटील उपस्थित होते.
वलगाव येथील अभिषेक नीलेश मेश्राम या लाभार्थ्यास प्रथम पोलिओ लस देऊन लसीकरण मोहिमेची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माता बाल संगोपन अधिकारी तथा तालुका वैद्यकीय अधिकारी विनोद करंजीकर यांनी केले. कार्यक्षेत्रातील एकही बालक पोलिओ लसीपासून वंचित राहता कामा नये, असे आवाहन राठोड यांनी केले. या कार्यक्रमाकरिता डॉ.पाटील, डॉ.मलिक, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सहायक कांबळे, परतेकी, आरोग्यसेविका कसर, धांडे, पखाले, आरोग्यसेवक देशमुख यांनी सहकार्य केले.