शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

पल्स ऑक्सिमीटर, थर्मल स्क्रिनिंगचा वापर अनियमित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2020 5:00 AM

जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात पंधरवड्यात सात कर्मचाऱ्यांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जिल्हा परिषदेच्या विविध विभागांसह पंचायत समिती कार्यालयात ये-जा करणाऱ्यांच्या तपासणीसाठी थर्मल स्क्रीनिंग गन, पल्स आॅक्सिमीटर आदी साधनसामग्री देण्यात आली. सदर साहित्य विभागांना वितरित करण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : कुणीही या, बिनधास्त प्रवेश करा

जितेंद्र दखने ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेत कोविड-१९ पसरू नये, याकरिता प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना जाहीर केल्या. विविध विभागांत कार्यरत कर्मचाऱ्यांसह कामानिमित्त येणाऱ्या अभ्यागतांचे प्रवेशद्वारावर तपासणीसाठी थर्मल स्क्रीनिंग गन तसेच पल्स ऑक्सिमीटर ही सामग्री पुरविली गेली. आता काही ठिकाणी ते विनावापर पडून आहेत आणि सर्व विभागांमध्ये बिनधास्त प्रवेश मिळत असल्याचे बुधवारी मिनीमंत्रालयात दिसून आले.जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात पंधरवड्यात सात कर्मचाऱ्यांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जिल्हा परिषदेच्या विविध विभागांसह पंचायत समिती कार्यालयात ये-जा करणाºयांच्या तपासणीसाठी थर्मल स्क्रीनिंग गन, पल्स आॅक्सिमीटर आदी साधनसामग्री देण्यात आली. सदर साहित्य विभागांना वितरित करण्यात आले. परंतु, या साहित्याचा उपयोग जिल्हा परिषदेच्या मोजक्याच ठिकाणी होत आहे. यात जिल्हा परिषदेचे मुख्य प्रवेशद्वार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, कृषी विभाग, शिक्षण विभाग, बांधकाम विभाग, सामान्य प्रशासन विभाग, पशुसंवर्धन विभाग, वित्त विभाग यांचा समावेश आहे. पाणीपुरवठा विभाग, सिंचन विभाग, पाणी व स्वच्छता विभाग, आरोग्य विभागात थर्मल स्क्रीनिंग, पल्स ऑक्सिमीटर यंत्राने तपासणी वा प्रथमत: कुठलीही चौकशी होत नसल्याचे चित्र पाहावयास मिळाले. कुणीही कार्यालयात ये-जा करीत असल्याचा प्रकार बुधवारी दृष्टीस पडला. जिल्हा परिषद प्रशासनाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी ज्या विभागांना साहित्य उपलब्ध करून दिले, त्यांचा वापर प्रभावीपणे न केल्यास या ठिकाणीही कोरोनाचा शिरकाव नव्हे, लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेता, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या