पल्स ऑक्सिमीटर, थर्मल स्क्रिनिंगचा वापर अनियमित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 05:00 AM2020-08-06T05:00:00+5:302020-08-06T05:01:22+5:30

जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात पंधरवड्यात सात कर्मचाऱ्यांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जिल्हा परिषदेच्या विविध विभागांसह पंचायत समिती कार्यालयात ये-जा करणाऱ्यांच्या तपासणीसाठी थर्मल स्क्रीनिंग गन, पल्स आॅक्सिमीटर आदी साधनसामग्री देण्यात आली. सदर साहित्य विभागांना वितरित करण्यात आले.

Pulse oximeter, use of thermal screening irregular | पल्स ऑक्सिमीटर, थर्मल स्क्रिनिंगचा वापर अनियमित

पल्स ऑक्सिमीटर, थर्मल स्क्रिनिंगचा वापर अनियमित

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषद : कुणीही या, बिनधास्त प्रवेश करा

जितेंद्र दखने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा परिषदेत कोविड-१९ पसरू नये, याकरिता प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना जाहीर केल्या. विविध विभागांत कार्यरत कर्मचाऱ्यांसह कामानिमित्त येणाऱ्या अभ्यागतांचे प्रवेशद्वारावर तपासणीसाठी थर्मल स्क्रीनिंग गन तसेच पल्स ऑक्सिमीटर ही सामग्री पुरविली गेली. आता काही ठिकाणी ते विनावापर पडून आहेत आणि सर्व विभागांमध्ये बिनधास्त प्रवेश मिळत असल्याचे बुधवारी मिनीमंत्रालयात दिसून आले.
जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात पंधरवड्यात सात कर्मचाऱ्यांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जिल्हा परिषदेच्या विविध विभागांसह पंचायत समिती कार्यालयात ये-जा करणाºयांच्या तपासणीसाठी थर्मल स्क्रीनिंग गन, पल्स आॅक्सिमीटर आदी साधनसामग्री देण्यात आली. सदर साहित्य विभागांना वितरित करण्यात आले. परंतु, या साहित्याचा उपयोग जिल्हा परिषदेच्या मोजक्याच ठिकाणी होत आहे. यात जिल्हा परिषदेचे मुख्य प्रवेशद्वार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, कृषी विभाग, शिक्षण विभाग, बांधकाम विभाग, सामान्य प्रशासन विभाग, पशुसंवर्धन विभाग, वित्त विभाग यांचा समावेश आहे. पाणीपुरवठा विभाग, सिंचन विभाग, पाणी व स्वच्छता विभाग, आरोग्य विभागात थर्मल स्क्रीनिंग, पल्स ऑक्सिमीटर यंत्राने तपासणी वा प्रथमत: कुठलीही चौकशी होत नसल्याचे चित्र पाहावयास मिळाले. कुणीही कार्यालयात ये-जा करीत असल्याचा प्रकार बुधवारी दृष्टीस पडला. जिल्हा परिषद प्रशासनाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी ज्या विभागांना साहित्य उपलब्ध करून दिले, त्यांचा वापर प्रभावीपणे न केल्यास या ठिकाणीही कोरोनाचा शिरकाव नव्हे, लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेता, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

Web Title: Pulse oximeter, use of thermal screening irregular

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.