शिधावस्तू व केरोसीनचे निर्धारित वाटप जाहीर
By Admin | Updated: September 27, 2015 00:17 IST2015-09-27T00:17:07+5:302015-09-27T00:17:07+5:30
जिल्ह्यातील पुरवठा विभागाचे सर्व पात्र कौटुंबिक शिधापत्रिकाधारकांसाठी माहे आॅक्टोबरच्या वितरणाकरिता रास्त भाव ...

शिधावस्तू व केरोसीनचे निर्धारित वाटप जाहीर
तातडीचे निर्देश : २१ सप्टेेंबरपासून अंमलबजावणी सुरू
अमरावती : जिल्ह्यातील पुरवठा विभागाचे सर्व पात्र कौटुंबिक शिधापत्रिकाधारकांसाठी माहे आॅक्टोबरच्या वितरणाकरिता रास्त भाव दुकानदारांना २१ सप्टेंबरपासून धान्यपुरवठा सुरू झाला आहे. स्वस्त धान्य दुकानदारांनी जिल्ह्यातील कार्यरत शिधापत्रिकाधारकांना तातडीने वितरण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
अंत्योदय कार्ड संख्येनुसार धारकांसाठी प्रतिशिधापत्रिका १० किलो, गहू १५ किलो, तांदूळ १० किलो, ज्वारी उपलब्धतेनुसार तसेच ५ किलो मका वितरित करण्यात येतील. गव्हाचा प्रतिकिलो दर २ रुपये असून तांदूळ प्रतिकिलो ३ रुपये या दराने वितरित करण्यात येईल. प्राधान्य कुुटुंब गटातील लोकसंख्येनुसार शिधापत्रिकाधारकांसाठी २ रुपये प्रतिकिलो दराने प्रतिव्यक्ती २ किलो गहू वितरित करण्यात येणार असून ३ रुपये प्रतिकिलो दराने प्रतिशिधापत्रिका २ किलो तांदूळ वितरित करण्यात येणार आहे. १ किलो ज्वारी व १ किलो मका वितरित करण्यात येणार आहे. साखर ५०० ग्रॅम दर प्रतिकिलो १३.५० रुपये आहे. एपीएल (केशरी) शेतकरी कुटुंबासाठी प्रतिव्यक्ती ३ किलो गहू २ रुपये प्रतिकिलो दराने, तर २ किलो तांदूळ प्रतिकिलो ३ रुपये दराने वितरित करण्यात येणार अहे.
माहे आॅक्टोबर २०१५ करिता अंत्योदय योजनेकरिता प्रतिकार्ड १० किलो गहू, ज्वारी ५ किलो व मका ५ किलो उपलब्धतेनुसार व प्रतिकार्ड १५ किलो तांदूळ तसेच प्राधान्य कुटुंब गटाकरिता प्रतिव्यक्ती २ किलो गहू, १ किलो ज्वारी, १ किलो मका उपलब्धतेनुसार तसेच २ किलो तांदूळ मंजूर केला आहे. एपीएल (केशरी) शेतकरी कुटुंबासाठी माहे आॅगस्ट २०१५ करिता गहू प्रतिव्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ याप्रमाणे धान्य मंजूर केले आहे. ज्वारीचे व मकाचे दर प्रतिकिलो १ रुपयाप्रमाणे विक्री दर राहील, याची सर्व कार्डधारकांनी नोंद घ्यावी. माहे आॅक्टोबर २०१५ करिता कार्डधारकांना साखरेचे वाटप सुरु आहे. प्रतिमाणसी ५०० ग्रॅम तसेच सणासुदीकरिता अधिक १५० ग्रॅम असे एकूण मिळून ६५० ग्रॅम उपलब्धतेनुसार.
२० आॅगस्टच्या शासन निर्णयान्वये शहरी व ग्रामीण भागातील बिगर गॅस शिधापत्रिकांसाठी प्रतिमाह एक व्यक्तीसाठी २ लिटर, दोन व्यक्तींसाठी ३ लिटर व ३ व्यक्ती व त्याहून अधिक व्यक्तीसाठी ४ लिटर उपलब्धतेनुसार देण्यात येईल. १ गॅस तसेच २ गॅस जोडणी शिधापत्रिकाधारकास वार्षिक १२ गॅस सिलिंडर सवलतीच्या दराने अनुज्ञेय असल्यामुळे त्यांना केरोसीन देण्यात येणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. (प्रतिनिधी)