प्रभाग ६ मधील सार्वजनिक समाजमंदिराला कुठलेही नाव नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:13 IST2021-09-27T04:13:24+5:302021-09-27T04:13:24+5:30

चांदूर रेल्वेतील युवकांची मागणी, नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन चांदूर रेल्वे : शहरातील प्रभाग क्रमांक ६ मधील नगर परिषदेच्या समाजमंदिराला ...

The public community center in Ward 6 does not need any name | प्रभाग ६ मधील सार्वजनिक समाजमंदिराला कुठलेही नाव नको

प्रभाग ६ मधील सार्वजनिक समाजमंदिराला कुठलेही नाव नको

चांदूर रेल्वेतील युवकांची मागणी, नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

चांदूर रेल्वे : शहरातील प्रभाग क्रमांक ६ मधील नगर परिषदेच्या समाजमंदिराला कुठलेही नाव देण्यात येऊ नये, या मागणीचे परिसरातील युवकांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना दिले.

चांदूर रेल्वे शहरात प्रभाग ६ मिलिंदनगरत शेख नासीर यांच्या घरासमोर नगर परिषदेने सार्वजनिक समाजमंदिर उभारले आहे. त्या समाजमंदिराला नाव देण्याची मागणी एका समुदायातर्फे करण्यात आली होती. परंतु, समाजमंदिराला नाव देण्याबाबत या परिसरातील युवकांनी विरोध दर्शविला तसेच सार्वजनिक म्हणून नाव ठेवावे. या इमारतीला कोणत्याही जाती, धर्माशी संबंधित नाव देण्यात येऊ नये, असे निवेदनात नमूद केले आहे. निवेदन नगराध्यक्ष शिट्टू सूर्यवंशी व मुख्याधिकारी यांना देण्यात आले. यावेळी आदिल सौदागर, शेख जुबेर, शहबाज मुल्ला, समीर पठान, जावेद पठाण, शेख इर्शाद, गौरव ढगे, फरहान खान, गौरव खिडकर, इम्रान सौदागर, नदीम सौदागर, आसिफ पठाण, शेख उसामा, अफसर अली, न्यामत खान, नासीरभाई, शेख उस्मान, शेख शफीक, शेख रफीक, शेख सोहेल, साबीर, जुम्मन पठाण, वाहेद सैदागर, इमरान सौदागर, शब्बीर मौलाना, शेख शाकीर आदींची उपस्थिती होती.

240921\205421201857-img-20210924-wa0013.jpg

photo

Web Title: The public community center in Ward 6 does not need any name