हरीना समिती करणार नेत्रदानासाठी जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 23:04 IST2017-12-22T23:04:04+5:302017-12-22T23:04:28+5:30
नेत्रदान व अवयवदान हे अनमोल दान असून, अवयवदान केल्याने अनेकांचे प्राण वाचू शकतात.

हरीना समिती करणार नेत्रदानासाठी जनजागृती
आॅनलाईन लोकमत
अमरावती : नेत्रदान व अवयवदान हे अनमोल दान असून, अवयवदान केल्याने अनेकांचे प्राण वाचू शकतात. नेत्रदानाने अनेकांना दृष्टी मिळू शकते. अवयवदान व नेत्रदान नागरिकांनी मूत्यूनंतर नागरिकांनी करावे, याबाबत जनजागृतीसाठी हरीना नेत्रदान समितीची स्थापना करण्यात आली आहे. शुक्रवारी आयोजीत पत्रपरिषदेमध्ये संयोजन समितीचीही घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये चंद्रकांत पोपट यांना मुख्य संयोजन करण्यात आले आहे.
पत्रपरिषदेला जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, विदर्भ यूथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष नितीन धांडे यांच्यासह हरीना अवयदान समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. आतापर्यंत अमरावतीतून १३०० जणांनी नेत्रदान केल्याची माहितीही यावेळी देण्यात आली आहे. ज्या रुग्णांचे ब्रेनडेड झाले आहे, त्यांच्या नातेवाइकांनी रुग्णाचे अवयवदान केल्यास पाच जणांना नवजीवन दिले जाऊ शकते. त्यामुळे अवयवदान व नेत्रदान करणे महत्त्वाचे असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी यावेळी सांगितले.
हरीना नेत्रदान समितीचे अध्यक्षपदी मनोज राठी, तर सचिव अमित चांडक आहेत. मुख्य संयोजनक म्हणून चंद्रकांत पोपट,यांच्या नावाची घोेषणा नावाची घोषणा केली. सदस्य ओमप्रकाश खेमचंदनी, सुरेश जैन, ओमप्रकाश चांडक, पप्पु गगलानी, जयप्रकाश पुरसवाणी, सुरेश वसाणी, आहेत. २०१८ करिता हरीना नेत्रदान संयोजन समितीमध्ये मुख्य संयोजक सुनील मंत्री, सदस्य रामप्रकाश गिल्डा, शरद कासट, सीमेश श्रॉफ, अशोक दुल्हानी, संजय भुतडा, प्रशांत राठी यांची निवड करण्यात आली आहे. ट्रस्टने महापालिकेकडे जागेची मागणी केली आहे.
जागा मिळाल्यानंतर नेत्रदान शस्त्रक्रिया करण्यासाठी एक हॉस्पिटल उभारण्याचा समितीचा मानस असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. समितीशी अधिकाधि लोकांना जुळण्याचे आवाहन करण्यात आले.