जलयुक्त शिवार अभियानात लोकसभाग महत्त्वाचा
By Admin | Updated: February 12, 2015 00:22 IST2015-02-12T00:22:16+5:302015-02-12T00:22:16+5:30
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात २५३ गावांची निवड करण्यात आली आहे. १९३ गावांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.

जलयुक्त शिवार अभियानात लोकसभाग महत्त्वाचा
अमरावती : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात २५३ गावांची निवड करण्यात आली आहे. १९३ गावांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. फेब्रुवारी अखेरीस कामांना सुरूवात होणार आहे. शासकीय निधीच्या व्यतिरिक्त जलसंधारणाची कामे करुन जिल्हा टंचाईमुक्त करायचा असल्याने लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे जिल्हाधिकारी यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत सांगितले.
जिल्ह्यातील ६० गावांमध्ये डीपीडीसी, महात्मा फुले जल व भूमी सूधारण नरेगा आणि सीएआरच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच अभियानात निवडलेल्या प्रत्येक गावासाठी एक नोडल अधिकाऱ्याची नियुक्त करण्यात आली आहे. गुरूवार हे अधिकारी गाव मुक्कामी राहून कामांचा आराखडा करणार आहे. गावकऱ्यांशी चर्चा करुन आराखडे गावकऱ्यांशी चर्चा करुन अंतिम स्वरुप देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
या अभियानासाठी जिल्हा व तालुकास्तरावर जलसंधारण तज्ज्ञ व अशासकीय सदस्यांचा समावेश असणाऱ्या समित्यांचे गठण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यामधील कामे ३० जून २०१५ पर्यंत पूर्ण करुन जलसाठ्याची साठवन करण्यावर भर देण्यात येणार आहे. व ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत निवडलेल्या २५३ गावे टंचाईमुक्त करण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या आहेत.