भीमटेकडी विकासासाठी ९१.४७ लाखांची तरतूद
By Admin | Updated: June 23, 2016 00:07 IST2016-06-23T00:07:27+5:302016-06-23T00:07:27+5:30
येथील भीमटेकडीच्या विकासकामांना लवकरच सुरूवात केली जाईल. त्यासाठी तब्बल ९१.४७ लाखांचा निधी मंजूर झाला

भीमटेकडी विकासासाठी ९१.४७ लाखांची तरतूद
पालकमंत्र्यांचे प्रयत्न : लवकरच पालटणार चेहरामोहरा
अमरावती : येथील भीमटेकडीच्या विकासकामांना लवकरच सुरूवात केली जाईल. त्यासाठी तब्बल ९१.४७ लाखांचा निधी मंजूर झाला असून उर्वरित निधीदेखील शासन तातडीने मंजूर करेल, अशी माहिती पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिली. बुधवारी भीमटेकडी परिसराची पाहणी करताना ते बोलत होते.
केंद्रीय पर्यटन मंत्रालय पुरस्कृत योजनेंतर्गत शिवटेकडी व भीमटेकडी या दोन्ही प्रकल्पांसाठी ४५७.३५ लक्ष रूपयांची मान्यता प्रदान करण्यात आली आहे. भीमटेकडी पर्यटनस्थळाचा विकास करण्यासाठी ९१.४७ लक्ष रूपये अमरावती महानगरपालिकेला प्राप्त झाले आहेत. या पर्यटनस्थळाचा विकास आराखडा हा १०४७.८५ लक्ष रूपयांचा आहे. उर्वरित निधी मंजूर करण्यासाठी देखील पालकमंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे. भीमटेकडीची पाहणी केल्यानंतर पालकमंत्र्यांनी बौद्ध प्रचार समितीचे अध्यक्ष घनश्याम आकोडे यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते, महापालिका आयुक्त हेमंत पवार, मनपा अभियंता जिवन सदार, नगरसेवक अविनाश मार्डीकर, गोपाल इंगळे प्रफुल थुल आदी उपस्थित होते. बौद्ध प्रचार समितीद्वारे यावेळी पालकमंत्र्यांचा सन्मा करण्यात आला.