अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करणार
By Admin | Updated: August 20, 2016 00:03 IST2016-08-20T00:03:58+5:302016-08-20T00:03:58+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालयातील बहुप्रतीक्षित सीटी स्कॅन मशीनचे लोकार्पण शुक्रवारी पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या हस्ते झाले

अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करणार
पालकमंत्री : इर्विन रुग्णालयात सीटी स्कॅन मशीनचे लोकार्पण
अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयातील बहुप्रतीक्षित सीटी स्कॅन मशीनचे लोकार्पण शुक्रवारी पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या हस्ते झाले. रुग्णांच्या आरोग्याशी संबंधित या मशीनच्या उपलब्धतेसाठी जिल्हा नियोजन समितीतून २ कोटी ४२ लक्ष रुपयांचा निधी पालकमंत्र्यांनी उपलब्ध करून दिला.
यावेळी महापौर चरणजीत कौर नंदा, आ.अनिल बोंडे, सुनील देशमुख, यशोमती ठाकूर, सीएस अरुण राऊत, सुपर स्पेशालीटीचे अधीक्षक श्यामसुंदर निकम व आरोग्य यंत्रणेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक अरुण राऊत यांनी केले. त्यांनी २०११ पासून मशीन बंद असल्यामुळे रुग्णांना आरोग्य सुविधा पुरविण्यास अडचणे येत होती मात्र आता आज लोकार्पण झालेली ही मशीन उद्यापासुन कार्यरत होणार असून रुग्णांसाठी सक्षम सुविधा सामान्य रुग्णालयातर्फे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सीटी स्कॅन मशीन साठी रेडियोलॉजीस्ट म्हणुन काम करणारे डॉक्टर अजय कडुकर, काळे, कपाळे आदींचा सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. इर्विन, डफरीन रुग्णालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे काम समाधानकारक असल्याचे उदगार त्यांनी काढले. अमरावतीत सार्वजनिक खाजगी भागीदारीतून वैद्यकीय महाविद्यालय आणणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. मशीन उपलब्ध करुन दिल्याबद्दल मैत्री संघटनेने पालकमंत्र्यांचा सत्कार केला. संचालन उमेश आगरकर व आभार अजय साखरे यांनी मानले.