पुसला येथील जॉब कार्डधारकांना रोजगार द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:15 IST2021-08-22T04:15:17+5:302021-08-22T04:15:17+5:30
वरूड : सन २००६ पासून पुसला येथील मजुरांनी जॉब कार्ड बनवले आहे. परंतु, मोजक्या जॉब कार्डधारकांनाच रोजगार असून, ...

पुसला येथील जॉब कार्डधारकांना रोजगार द्या
वरूड : सन २००६ पासून पुसला येथील मजुरांनी जॉब कार्ड बनवले आहे. परंतु, मोजक्या जॉब कार्डधारकांनाच रोजगार असून, शंभरहून अधिक जॉब कार्डधारक रोजगारापासून वंचित आहेत. त्यामुळे बहुजन विकास आघाडीने बेमुदत साखळी उपोषणाचा इशारा जिल्हा महासचिव सुशील बेले यांच्यामार्फत तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांना दिला आहे.
पुसला येथील मजुरांनी जॉब कार्ड बनवले तरी रोजगार मिळत नसल्याचे ग्रामरोजगार सेवक व ग्रामपंचायतीला कळविण्यात आले होते. त्यावर कार्यवाही न झाल्याने नायब तहसीलदार प्रतिभा चौधरी व गटविकास अधिकारी वासुदेव कनाटे यांच्याकडे रोजगार देण्याची मागणी करण्यात आली. याप्रसंगी पुसला येथील नीलेश डोंगरे, सिद्धार्थ ढोके, राहुल सहारे, नितेश डबरासे, धम्मपाल डोंगरे, राहुल पाटील, गयना डोंगरे, रमा वाघमारे, कमळजा डोंगरे, शोंभा गजबे, द्वारका सोनारे, कविता डोंगरे, सुनी डोंगरे, गंगा डोंगरे, शांता गजबे, शशिकला चक्रपाणी, ललिता गोरले, सुमन डोंगरे, शोभा भाजीखाये, प्रिया लाड , रजना लाड, निर्मला लाड, रजना डेगे, मंजू तायवाडे, वंदना बावने, ज्योत्स्ना लाड, रेखा कावनपुरे, शोभा लाड आदी जॉब कार्डधारक उपस्थित होते.