अमरावतीत महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटनेच्या वतीने नवनीत राणांचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2022 13:41 IST2022-09-08T13:41:31+5:302022-09-08T13:41:38+5:30
यावेळी नवनीत राणा यांचा निषेध करण्यासाठी पोलीस कुटुंबीय मोठ्या प्रमाणावर रस्तावर उतरले होते.

अमरावतीत महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटनेच्या वतीने नवनीत राणांचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी
अमरावती - अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये एका युवतीच अपहरण झाल्याचा आरोप करत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीअमरावती शहरातील राजपेठ पोलीस ठाण्यात पोलिसांसोबत हुज्जत घालून राडा केला होता. पोलिसांना अपमानास्पद वागणूक खासदार नवनीत राणा यांनी दिली. तसेच त्यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्यामुळे आज राजापेठ पोलीस स्टेशन मध्ये महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटनेच्या वतीने नवनीत राणा यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. तसेच पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग यांना सुद्धा निवेदन देण्यात आले.
यावेळी नवनीत राणा यांचा निषेध करण्यासाठी पोलीस कुटुंबीय मोठ्या प्रमाणावर रस्तावर उतरले होते. त्यामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी नवनीत राणा यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे व वारंवार पोलिसांबद्दल अपमानास्पद बोलणे हे त्यांनी टाळावं व त्यांनी तात्काळ पोलिसांची माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र पोलीस भरती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.