शासनाच्या ‘त्या’ परिपत्रकाचा ‘आप’ने केला निषेध
By Admin | Updated: September 11, 2015 00:31 IST2015-09-11T00:31:13+5:302015-09-11T00:31:13+5:30
राज्यातील राजकीय नेत्यांवर केलेली टीका ही देशद्रोहाचा गुन्हा ठरणार असल्याचे परिपत्रक शासनाने त्वरित मागे घ्यावे, ....

शासनाच्या ‘त्या’ परिपत्रकाचा ‘आप’ने केला निषेध
निवेदन : परिपत्रक मागे घेण्याची मागणी
अमरावती : राज्यातील राजकीय नेत्यांवर केलेली टीका ही देशद्रोहाचा गुन्हा ठरणार असल्याचे परिपत्रक शासनाने त्वरित मागे घ्यावे, अशी मागणी गुरूवारी आम आदमी पार्टीच्यावतीने जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
राज्यातील कोणतेही राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधींवर टीका करणाऱ्यांविरोधात राजद्रोहाच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो, अशा आशयाचे परिपत्रक नुकतेच राज्य शासनाने काढले आहे. हे परिपत्रक सर्वांसाठीच जाचक ठरणारे आहे. त्यामुळे शासनाने हे परिपत्रक तातडीने मागे घ्यावे, अशी मागणी आम आदमी पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे.
निवेदन देताना नितीन उजगावकर, उज्ज्वल पांडव, प्रजय कळसकर, सुमित चौधरी, रंजना मामर्डे, संजय शहाकार, सुधीर तायडे, रवींद्र चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी 'आप'च्या पदाधिकाऱ्यांनी मागणी रेटून धरली. (प्रतिनिधी)