डॉक्टरांवरील हल्ल्याचा ‘आयएमए’कडून निषेध
By Admin | Updated: July 16, 2016 00:09 IST2016-07-16T00:09:42+5:302016-07-16T00:09:42+5:30
वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील अरुण पावडे या डॉक्टरांवरील हल्ल्याचा ‘आयएमए’च्या अमरावती शाखेने तीव्र निषेध केला आहे.

डॉक्टरांवरील हल्ल्याचा ‘आयएमए’कडून निषेध
निवेदन : हल्लेखोरांवर कारवाईची मागणी
अमरावती : वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील अरुण पावडे या डॉक्टरांवरील हल्ल्याचा ‘आयएमए’च्या अमरावती शाखेने तीव्र निषेध केला आहे. संघटनेच्या शेकडो सदस्यांनी राज्य उपाध्यक्ष वसंत लुंगे यांचे नेतृत्वात शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
आर्वी येथील वैद्यकीय व्यवसायी अरुण पावडे यांच्यासह त्यांच्या घर व रुग्णालयावर हल्ला करण्यात आला. या हल्लेखोरांविरुद्ध २०१० च्या कायद्यानुसार गुन्हे दाखल करुन त्वरीत अटक करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी आयएमए पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली.
यावेळी बी. आर. देशमुख, शोभा पोटोडे, अलका कुथे, नीरज मुरके, अशोक लांडे, अभिजित देशमुख, दिनेश वाघोडे, उल्हास संगई, भूपेश भोंड, अरविंद शिरभाते, सी.सी. केला, अमित आचलिया, अभय राठोड, प्रशांत गहुकार, गोपाल बेलोकार, नितीन राठी, निलीमा अर्डक, अजय डफळे, सावदेकर, प्रधान मानकर, शशी चौधरी, तृप्ती गावडे, राधा सावदेकर यांच्यासह इंडियन मेडिकल असोशिएशनचे शेकडो पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)