पूरग्रस्त भागात हवी संरक्षण भिंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2016 00:14 IST2016-08-02T00:14:46+5:302016-08-02T00:14:46+5:30

दरवर्षी येणाऱ्या पुराने तीन तालुक्यांतील हजारो कुटुंब बेघर होतात़ या भागात पूर सरंक्षण भिंत,...

Protection wall of flood protection area | पूरग्रस्त भागात हवी संरक्षण भिंत

पूरग्रस्त भागात हवी संरक्षण भिंत

वीरेंद्र जगताप : पुरवणी विनियोजन विधेयकात मांडले २७ मुद्दे 
अमरावती : दरवर्षी येणाऱ्या पुराने तीन तालुक्यांतील हजारो कुटुंब बेघर होतात़ या भागात पूर सरंक्षण भिंत, जळगाव आर्वी येथील पूरग्रस्त कुटूंबाना कायमचे जमीन पट्टे देण्यासोबतच पुरवणी विनियोजन विधेयकात २७ मुद्दे आ़वीरेंद्र जगताप यांनी मांडले आहेत़ दरम्यान या पावसाळी विधीमंडळ अधिवेशनात धामणगाव मतदार संघातील विवीध समस्यांच्या ४७ लक्षवेधी सूचना राजपटलासमोर मांडल्या आहेत़
धामणगाव विधानसभा मतदार संघाचे तिसऱ्यांदा आ़वीरेंद्र जगताप नेतृत्व करीत असतांना आजपर्यंत कोट्यवधी रूपयांची विकासकामे करून त्यांनी या मतदार संघाचा चेहरा -मोहरा बदलविला आहे़ सध्या राज्यात भाजपाचे शासन असलेतरी या अधिवेशनात धामणगाव, चांदूररेल्वे, नांदगाव खंडेश्वर तिन्ही तालुक्यातील सर्वांगीन समस्या पुरवणी विनीयोजन विधेयकाद्वारे मांडल्या आहेत़ (प्रतिनिधी)

पूरग्रस्तांना मिळावा आधार
मागील अनेक वर्षांपासून तीनही तालुक्यांतील नदी, नाल्या काठावरील कुटुंबांना येणाऱ्या पुराचा मोठा फटका बसतो. रात्रीला आलेल्या पुरामुळे घरातील अन्नधान्य व कपडे ओले होतात. अनेकांना बेघर व्हावे लागते. त्यामुळे नदी व नाल्याकाठावर सरंक्षण भिंत बाधण्याकरीता निधी द्यावा तसेच जळगाव आर्वी येथील सन १९९४ च्या महापूरामुळे पुनर्वसित झालेले जळगाव आर्वी येथील या कुटुंबांना कायमस्वरूपी मालकीची पट्टे देण्याची मागणी आ़वीरेंद्र जगताप यांनी केली आहे़

पोलीस ठाण्यांच्या इमारती जीर्ण
चांदूररेल्वे, नांदगाव खंडेश्वर, मंगरूळ दस्तगीर, तळेगाव दशासर, दत्तापूर, येथील पोलीस ठाण्याच्या इमारती शिकस्त झाल्या आहे़ तर नव्याने निर्माण झालेल्या मंगरूळ चव्हाळा येथील पोलीस ठाण्याला इमारत नाही, चांदूररेल्वे येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाची इमारत जीर्ण झाल्या आहेत़ त्याकरिता शासनाने अधिक निधी द्यावा, असे पुरवणी विनियोजन विधेयकाच्या समाविष्ट मुद्यांकरिता आ़वीरेंद्र जगताप यांनी विधिमंडळाला पत्र दिले आहे़

हुतात्मा स्मारकांना हवा निधी
धामणगाव मतदारसंघातील चांदूररेल्वे व सातेफळ हुतात्मा स्मारक आहे़ या स्मारकाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे़ चांदूररेल्वे येथील स्मारकाकरिता एक कोटी कोटी २५ लाख तर सातेफळ येथील स्मारकाच्या दुरूस्तीसाठी पंन्नास लक्ष रूपयांची मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे़

दत्तक गावांना द्यावा विकासासाठी निधी
लोकप्रतिनीधी गाव दत्तक योजनेअंतर्गत काळमजापूर, उसळगव्हाण, मोखड ही आदर्श गावे निर्माण करण्यासाठी दत्तक घेतले आहे़ परंतु शासनाने या गावांसाठी अद्यापावेतो निधी उपलब्ध करून दिलेला नाही. त्यामुळे या गावांचा सर्वांगीण विकास खुंटला आहे. तातडीने विकास व्हावा याकरिता निधीची मागणी आ. जगताप यांनी केली आहे़

पुरवणी विनियोजन विधेयकात २७ मुद्यांसह बगाजी व कृष्णाजी सागर च्या विकासासाठी निधीची मागणी केली आहे़मतदार संघाच्या विकासाकरिता निधी न मिळाल्यास आंदोलनाशिवाय पर्याय नाही़
- वीरेंद्र जगताप,
आमदार, धामणगाव रेल्वे

Web Title: Protection wall of flood protection area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.