कलेमुळेच जीवनाला समृद्धीचा बहर: कुलगुरू खेडकर

By Admin | Updated: September 30, 2015 00:53 IST2015-09-30T00:53:47+5:302015-09-30T00:53:47+5:30

खामगाव येथे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या युवा महोत्सवाचे थाटात उद्घाटन.

Prosperity of life due to art: Kulguru Khedkar | कलेमुळेच जीवनाला समृद्धीचा बहर: कुलगुरू खेडकर

कलेमुळेच जीवनाला समृद्धीचा बहर: कुलगुरू खेडकर

खामगाव (जि. बुलडाणा) : मनुष्याच्या सुखी जीवनाला कलेमुळेच समृद्धीचा बहर येतो, असे प्रतिपादन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलकुरू डॉ. मोहन खेडकर यांनी केले. येथील गो.से. विज्ञान, कला आणि वाणिज्य महाविद्यालयात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने आयोजित 'युवा महोत्सव-२0१५-१६' च्या उद्घाटनाप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या महोत्सवाचे उद्घाटन माजी विरोधी पक्ष नेते तथा आ. भाऊसाहेब फुंडकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र बोबडे, विद्यापीठाचे सांस्कृतिक समन्वयक प्रा. एम. टी. देशमुख, महेश पटेल, निखिलेश नलोडे, प्रा. एम.आर.इंगळे, गो. से. महाविद्यालयाचे प्राचार्य विलास बायस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना कुलगुरू डॉ. खेडकर पुढे म्हणाले की, भारतीय संस्कृती ही जगात श्रेष्ठ आहे. त्यामुळे भारताला संपूर्ण जगात मानाचे स्थान आहे. युवकांनी आपल्या अंगी असलेल्या सुप्त गुणांनी कलेचे सादरीकरण करावे. लुप्त पावत चाललेल्या कलांना युवा महोत्सवाच्या माध्यमातून वाव दिला जातो. त्यामुळे भारतीय संस्कृतीच्या संवर्धनालाही युवा महोत्सवातून हातभार लागत आहे. आ. भाऊसाहेब फुंडकर यांनी गो.से. महाविद्यालय हे ऐतिहासिक महाविद्यालय असून, या महाविद्यालयात शिक्षण घेतल्याचा आपणाला अभिमान असल्याचे सांगितले. युवा महोत्सवाच्या माध्यमातून सुप्त गुणांना वाव देण्यासोबतच देशाला नावलौकीक मिळवून देण्यासाठी युवकांनी शक्ती खर्ची घालावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी प्रा. एम.टी. देशमुख, प्रा. एम.आर.इंगळे यांचीही समायोचित भाषणे झालीत. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपाध्यक्ष अशोक झुनझुनवाला, सचिव डॉ. सुभाष बोबडे, कोषाध्यक्ष प्रकाश तांबट, राजेंद्र झांबड, अजिंक्य बोबडे, प्रा. गुल्हाणे, प्रा. आर. आर. गव्हाळे, प्रा. रागीब देशमुख यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांनी संत गाडगेबाबा, संत गजानन महाराज आणि सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर पूजा घाटोळ आणि संचाने सरस्वती वंदना सादर केली. प्रास्ताविक प्राचार्य विलास बायस्कर यांनी केले. संचालन प्रा. संगीता वायचाळ यांनी केले. आभार प्रा. पृथ्वीराजसिंह ठाकूर यांनी मानले.

उद्घाटक आणि सेकंड इनिंग.!

युवा महोत्सव म्हटल्यानंतर उदघाटक म्हणून युवकांना संधी द्यायला हवी होती, असे आ. भाऊसाहेब फुंडकर यांनी सांगितले. समोर युवा जल्लोष असताना व्यासपीठावरील आमच्यासारखी ज्येष्ठ मंडळी ? कसं वाटतं? असे म्हणताच युवकांनी टाळ्य़ा, शिट्या वाजविल्या. हाच धागा पकडून मग कुलगुरु डॉ. खेडकर यांच्यासह इतर मान्यवरांनी आता आपली सेकंड इनिंग सुरु असून आपण सर्व जण मनाने तरुणच आहोत, असे सांगितले. एके काळी आपणही याच सभागृहात युवक म्हणून उपस्थित होता, याचेही स्मरण कुलगुरुंनी आ. फुंडकरांना करुन दिले तेव्हा, सभागृह टाळ्य़ा आणि शिट्टय़ांनी दणाणून गेले !

कुलगुरूंना मानवंदना!

कुलगुरू डॉ. मोहन खेडकर यांना एनसीसीच्यावतीने मानवंदना देण्यात आली. यावेळी आ.भाऊसाहेब फुंडकर, बाबसाहेब बोबडे, प्राचार्य बायस्कर, संजय कापसे, महेश बेलोकार, योगेश घणोकार, विजय शिंदे, शुभम रोकडे, वैभव टेकाळे, आकाश हिवराळे, विष्णु काटे यांची उपस्थिती होती. पायलटींग कांचन गवई, पूनम उन्हाळे यांनी केले.

Web Title: Prosperity of life due to art: Kulguru Khedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.