अनुकंपा तत्त्वावरील २० जागा भरतीचा प्रस्ताव

By Admin | Updated: June 19, 2014 23:36 IST2014-06-19T23:36:08+5:302014-06-19T23:36:08+5:30

महापालिकेत अुकंपा तत्त्वावरील २० जागांच्या भरतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता असून भरती प्रक्रिया राबविली जाईल, अशी माहिती आहे.

Proposal for recruitment of 20 seats on compassionate principle | अनुकंपा तत्त्वावरील २० जागा भरतीचा प्रस्ताव

अनुकंपा तत्त्वावरील २० जागा भरतीचा प्रस्ताव

शासन निर्णयाधीन: अनेक वर्षांची प्रतीक्षा फळाला
अमरावती : महापालिकेत अुकंपा तत्त्वावरील २० जागांच्या भरतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता असून भरती प्रक्रिया राबविली जाईल, अशी माहिती आहे.
शासनाची नोकर भरतीवर बंदी असली तरी अनुकंपा तत्त्वावरील पदांची भरती प्रक्रिया राबवून अनुकंपा धारकांना नोकरीची संधी मिळावी, यासाठी आयुक्त अरुण डोंगरे यांनी याप्रकरणी लक्ष घालून प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. सामान्य प्रशासन विभागप्रमुख मंगेश जाधव यांनी या प्रस्तावाच्या अनुषंगाने आवश्यक असलेली माहिती पूर्ण करुन आयुक्तांच्या स्वाक्षरीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. अनेक वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या हा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविल्याने त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. महापालिकेत अनेक विभागात पदे रिक्त आहेत. मात्र भरती प्रक्रिया बंद असल्याने कर्मचाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे. अनुकंपा तत्वावरील भरती प्रक्रिया राबवावी ही कर्मचारी संघटनांची अनेक वर्षापासूनची मागणी होती. ही मागणी काही दिवसांत पूर्ण होण्याचे संकेत आहेत.

Web Title: Proposal for recruitment of 20 seats on compassionate principle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.