भावी नवरदेवाविरुद्ध शारीरिक शोषणाचा गुन्हा
By Admin | Updated: May 12, 2016 00:15 IST2016-05-12T00:15:08+5:302016-05-12T00:15:08+5:30
लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षांपासून शारीरिक संबंध ठेवणाऱ्या नवरदेवाविरुद्ध बडनेरा पोलिसांनी तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

भावी नवरदेवाविरुद्ध शारीरिक शोषणाचा गुन्हा
बडनेरा : लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षांपासून शारीरिक संबंध ठेवणाऱ्या नवरदेवाविरुद्ध बडनेरा पोलिसांनी तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या इसमाचे १३ मे रोजी लग्न ठरले आहे. अशा प्रकारचा आठवड्यातला हा दुसरा गुन्हा आहे.
रवि रफायल गॅब्रीयल गावंडे (३०, रा.मूर्तिजापूर) असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. यातील फिर्यादी मुलगी मूर्तिजापूरचीची आहे. दोन वर्षांपूर्वी या दोघांची भेट चर्चमध्ये झाली होती. त्याचे प्रेमात रुपांतर झाले. लग्नाचे आमिष दाखवून सदर आरोपी फिर्यादीस बोलावून शारीरिक संबंध ठेवत होता, असे तक्रारीत नमूद आहे. ६ मे रोजी फिर्यादीस बोलावून शारीरिक संबंध ठेवले तेव्हा फिर्यादीस आरोपीजवळ त्याच्या लग्नाची पत्रिका दिसून पडली. त्यावर विचारणा केली असता आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादी मुलीने तक्रारीत नमूद केले आहे. सदर प्रकरणातील बडनेरा पोलिसांनी भादंवि ३७६, ४१७, ५०४, ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीस अटक केली आहे. १३ मे रोजी त्याचे लग्न ठरले आहे. गेल्या आठवड्यात लग्नाच्या काही दिवस आधी बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याची ही दुसरी घटना आहे.
याप्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक प्राजक्ता धावडे करीत आहेत. आरोपी हा बडनेरा रेल्वेस्थानकावरील ओएसी कार्यालयात केबल आॅपरेटर म्हणून नोकरीला आहे. (शहर प्रतिनिधी)