पदोन्नती दोन महिन्यांसाठीच !
By Admin | Updated: September 22, 2014 23:10 IST2014-09-22T23:10:19+5:302014-09-22T23:10:19+5:30
विधानसभा निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी स्थानिक सहायक पोलीस उपनिरीक्षक, हवालदारांना उपनिरीक्षकपदी पदोन्नती देण्याचे आदेश पोलीस महासंचालक कार्यालयाकडून

पदोन्नती दोन महिन्यांसाठीच !
पोलीस नाराज : पीएसआयला एएसआयचे वेतन
प्रसन्न दुचक्के -अमरावती
विधानसभा निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी स्थानिक सहायक पोलीस उपनिरीक्षक, हवालदारांना उपनिरीक्षकपदी पदोन्नती देण्याचे आदेश पोलीस महासंचालक कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आले आहेत. या अनुषंगाने शहर पोलीस आयुक्तालयातील १८ सहायक पोलीस उपनिरीक्षक व हवालदारांना पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. परंतु ही बढती केवळ दोन महिन्यांसाठीच असेल आणि बढतीनंतरही मूळ पदाचेच वेतन मिळणार असल्याने पोलीस वर्तुळात प्रचंड नाराजी पसरली आहे.
पोलीस सूत्रांनुसार, विधानसभा निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ही स्थिती हाताळण्यासाठी पोलीस दलात मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज भासणार आहे. यादृष्टीने कनिष्ठ कर्मचाऱ्यांना निवडणूक काळात जादा अधिकार देण्यासाठी हा निर्णय आहे.