जंगलाचे संवर्धन आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2016 00:11 IST2016-02-23T00:11:54+5:302016-02-23T00:11:54+5:30
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जंगलाचे संवर्धन आवश्यक आहे.

जंगलाचे संवर्धन आवश्यक
व्याघ्र प्रकल्प स्थापना दिन : प्रवीण पोटे यांचे प्रतिपादन
अमरावती : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जंगलाचे संवर्धन आवश्यक आहे. त्याकरिता लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सोमवारी येथे केले.
येथील ‘कुलाढाप’मध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या ४२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्य वनसंरक्षक संजीव गौड, क्षेत्र संचालक दिनेशकुमार त्यागी आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकारणामार्फत पुरस्कार मिळाल्यामुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्प चांगले काम करत असल्याची भावना पालकमंत्र्यांनी व्यक्त केली. वन संरक्षणासाठी चांगल्या दर्जाची शस्त्र घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात पर्यटनासाठी हत्ती उपलब्ध करून द्यावे, असे निर्देशही त्यांनी मुख्य वनसंरक्षकांना दिले.
यावेळी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना ना. पोटे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी ‘मेळव्याघ्र’ या नियतकालिका व संजीव गौड यांनी वन कायदा अधिनियमाचे मराठीत भाषांतर केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. डी. एस. डोंगरे, पी. सी. साठे, फगनसिंग उईके, एन. के. अलोने, व्ही. एल चव्हाण, एन. आर उगले, ए. एस. ऐवले, रत्नशील अंभोरे, जी. जे. चव्हाण, के. टी. बेडेकर, बी. आर. पवार, ए. एस. वानखडे, रिना पवार, एच. एस. कसदेकर आदींचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)