नांदगाव एमआयडीसीतील भारत डायनामिक्सचा प्रकल्प मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 22:07 IST2018-11-20T22:06:59+5:302018-11-20T22:07:25+5:30
नांदगाव पेठ पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत भूमिपूजनानंतर रखडलेला भारत डायनामिक्स प्रा. लि. हा प्रकल्प मार्गी लागला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नाला यश आले असून, जिल्ह्यातील शेकडो हातांना रोजगार मिळणार आहे.

नांदगाव एमआयडीसीतील भारत डायनामिक्सचा प्रकल्प मार्गी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नांदगाव पेठ पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत भूमिपूजनानंतर रखडलेला भारत डायनामिक्स प्रा. लि. हा प्रकल्प मार्गी लागला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नाला यश आले असून, जिल्ह्यातील शेकडो हातांना रोजगार मिळणार आहे.
जिल्ह्यातील नांदगाव पेठ येथील औद्योगिक वसाहतीमधील भारत डायनॉमिल्स प्रा. लि. या प्रकल्पाचे भूमिपूजन तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी केले होते. शॉर्ट मिसाईल बनविणाऱ्या या कारखान्यामुळे अमरावतीचे नाव जगाच्या नकाशावर येईल, अशी अपेक्षा असतानाच हा प्रकल्प रखडला. मात्र, याविषयी सातत्याने पाठपुरावा ना. प्रवीण पोटे यांनी केला. हा आरओई प्रकल्पाचे कंत्राट एका रशीयन कंपनीला मिळाले आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केल्याचे फलीत झाले आहे. या प्रकल्पामुळे शेकडो भूमीहिनांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारा हा प्रकल्प ठरेल. याद्वारे युवकांना रोजगार मिळेल व प्रकल्पामुळे अमरावती जगाच्या नकाशावर येत असल्याचा अभिमान आहे. यासाठी मुख्यमंत्री व ना. नितीन गडकरी यांच्याकडे केलेला पाठपुरावा व त्यांनी केलेले प्रयत्न सार्थकी लागले.
- प्रवीण पोटे, पालकमंत्री