रतन इंडिया कंपनी विरोधात प्रकल्पग्रस्त कर्मचारी एकवटले
By Admin | Updated: March 2, 2016 00:49 IST2016-03-02T00:49:20+5:302016-03-02T00:49:20+5:30
नांदगावपेठच्या औद्योगिक वसाहतीतील रतन इंडिया कंपनीतील कंत्राटदारांमार्फत नियुक्त कामगार व प्रकल्पग्रस्त कामगारांच्या कामात समानता असली तरी वेतनामध्ये तफावत आहे.

रतन इंडिया कंपनी विरोधात प्रकल्पग्रस्त कर्मचारी एकवटले
आंदोलन : जिल्हा कचेरीसमोर दिले धरणे
अमरावती : नांदगावपेठच्या औद्योगिक वसाहतीतील रतन इंडिया कंपनीतील कंत्राटदारांमार्फत नियुक्त कामगार व प्रकल्पग्रस्त कामगारांच्या कामात समानता असली तरी वेतनामध्ये तफावत आहे. शैक्षणिक अर्हता असतानादेखील त्यांना सहायक पदावरच नियुक्ती दिली गेली. या विरोधात प्रकल्पग्रस्तांनी मंगळवारी जिल्हाकचेरीसमोर धरणे दिले.
रतन इंडिया कंपनीने ‘आॅफर लेटर’ देताना सर्व प्रकल्पग्रस्तांना शैक्षणिक पात्रता व अनुभव प्रमाणपत्र मागितले होते. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही. प्रकल्पग्रस्त युवकांच्या व इतर कामगारांच्या वेतनात मोठ्या प्रमाणात तफावत आहे. कामगाराच्या वेतनातून २४ टक्के रकमेची भविष्य निर्वाह निधीसाठी कपात केली जाते. यामध्ये १२ टक्के रक्कमेचा कंपनीद्वारे भरणा करणे अपेक्षित असताना कंपनी वाटा उचलत नसल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. आंदोलनात प्रवीण मनोहर, नंदकिशोर बिजवे, ज्ञानेश्वर इंगळे, रमेश ठाकरे, प्रफुल्ल तायडे, देवानंद इंगळे, सचिन चेंडकापुरे, सुनील खंडारे, अजय खंडारे, धीरज बिजवे, हेमंत ठाकरे, कैलास इंगोले, नंदकिशोर मंगळे, रवी चव्हाण यांचासहभाग होता.