आंबेडकर भवन पाडण्याचा विविध संघटनांद्वारा निषेध

By Admin | Updated: July 20, 2016 00:10 IST2016-07-20T00:10:31+5:302016-07-20T00:10:31+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित वास्तू, स्मृती व साहित्याचे जतन केल्या जात असताना....

Prohibition by various organizations of Ambedkar Bhawan Dam | आंबेडकर भवन पाडण्याचा विविध संघटनांद्वारा निषेध

आंबेडकर भवन पाडण्याचा विविध संघटनांद्वारा निषेध

ट्रस्टींना अटक करा : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अमरावती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित वास्तू, स्मृती व साहित्याचे जतन केल्या जात असताना दुसरीकडे आंबेडकर चळवळीचे केंद्र असणाऱ्या आंबेडकर भवन आणि बुद्धभूषण प्रेस तोडून ऐतिहासिक वारसा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा विविध सामाजिक संघटनांनी मंगळवारी निषेध केला.
विधानभवनावर मंगळवारी मोर्चा काढण्यात आला, त्याला समर्थन म्हणून सामाजिक संघटना, विचारवंत, साहित्यिक, नागरिकांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना निवेदन दिले. रत्नाकर गायकवाड व ट्रस्ट्रींचा निषेध नोंदविला. सरकारने या प्रकरणी अजून कोणालाही अटक केली नाही.
सरकार आरोपींना पाठीशी घालत असल्याचा समज निर्माण झाला आहे. अशा घटना पुढे होऊ नये, याकरिता ट्रस्टींना बडतर्फ करुन अटकेची मागणी करण्यात आली. यावेळी दिलीप एडतकर, सुधाकर तलवारे, प्रवीण मनोहर, बाबुराव नवले, वामन गवई, सुभाष गवई, प्रकाश इंगळे, प्रताप बागढे, रणजित चव्हाण, कमलाकर पायस, मिलिंद तायडे आदी होते.

Web Title: Prohibition by various organizations of Ambedkar Bhawan Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.