बच्चू कडूंच्या अटकेचा निषेध
By Admin | Updated: April 2, 2016 00:18 IST2016-04-02T00:18:27+5:302016-04-02T00:18:27+5:30
मुंबई येथे मंत्रालयात कामानिमित्त गेलेले अचलपुरचे आमदार बच्चू कडू यांच्यावर गुन्हे नोंदविण्यात आल्यानंतर अटक करण्यात आली आहे.

बच्चू कडूंच्या अटकेचा निषेध
गुन्हे मागे घेण्याची मागणी : बहुरूपी जनजागृती कलामंच
अमरावती : मुंबई येथे मंत्रालयात कामानिमित्त गेलेले अचलपुरचे आमदार बच्चू कडू यांच्यावर गुन्हे नोंदविण्यात आल्यानंतर अटक करण्यात आली आहे. या निषेधार्थ शुक्रवारी बहुरूपी जन जागृती कला मंचने गुन्हे मागे घेण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे शुक्रवारी केली आहे.
मंत्रालयातील उपसचिव हे एका शासकीय कर्मचाऱ्यांचे काम करण्यात हयगय करीत असल्याने अचलपुरचे आ. बच्चू कडू यांनी सामान्य प्रशासन विभागात जाऊन त्यांची भेट घेऊन संबंधित कर्मचाऱ्यांचे काम करुन देण्याची मागणी केली होती. त्यावर उपसचिव यांच्यासोबत संबंधितांमध्ये वाद झाला. मात्र, घटनेचा विपर्यास करून आमदार बच्चू कडूंविरुध्द खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप बहुरुपी जन जागृती कला मंचचे केला आहे. निवेदन देतेवेळी राजकपुर पठाणेकर, बबीता पठाणेकर यांच्यासह कलामंचचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.