आंबेडकर भवन पाडल्याप्रकरणी निषेध

By Admin | Updated: June 30, 2016 00:05 IST2016-06-30T00:05:32+5:302016-06-30T00:05:32+5:30

देशभरातील बौद्ध बांधवांचे श्रद्धास्थान असलेले मुंबई महानगरपालिकेंतर्गत येणाऱ्या दादर येथील आंबेडकर भवन बुलडोजरने जमिनदोस्त केल्याच्या घटनेचा

Prohibition of demolition of Ambedkar Bhawan | आंबेडकर भवन पाडल्याप्रकरणी निषेध

आंबेडकर भवन पाडल्याप्रकरणी निषेध

कारवाई करा : नायब तहसीलदारांना निवेदन
तिवसा : देशभरातील बौद्ध बांधवांचे श्रद्धास्थान असलेले मुंबई महानगरपालिकेंतर्गत येणाऱ्या दादर येथील आंबेडकर भवन बुलडोजरने जमिनदोस्त केल्याच्या घटनेचा तिवसा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा विचारमंचद्वारा मंगळवारी नायब तहसीलदार राठोड यांना निवेदन देऊन तीव्र निषेध करण्यात आला.
या प्रकरणातील दोषी अधिकारी रत्नाकर गायकवाड यांचेवर कारवाई करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. २४ जून रोजी दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मालकी हक्काच्या जागेत असलेली बाबासाहेबांनी स्थापन केलेली बुद्धभूषण प्रिटींग प्रेस मुंबई महानगरपालिकेने मध्यरात्री जमीनदोस्त केली. तेथील अधिकारी रत्नाकर गायकवाड यांचे आदेशाने सदर प्रकार घडला आहे. यामुळे बौद्धबांधव व आंबेडकर जनता संतप्त झाली असून या घटनेचा तिवसा शहरात तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार बबन राठोड, राज माहोरे, तालुका संघटक सूरज दहाट, नगरसेवक अनिल थुल, रा.काँ. चे शहाध्यक्ष नगरसेवक भूषण यावले, भारिपचे जानराव मनोहर, बसपाचे आशिष ढोले, जगदीश चतुर, संदीप दहाट, अंकुश रामटेके, सिद्धार्थ मुंदे, सूरज खोब्रागडे, धर्मपाल पखाले, संदीप कठाने उपस्थित होते.

Web Title: Prohibition of demolition of Ambedkar Bhawan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.