समीर भुजबळ यांच्या अटकेचा निषेध
By Admin | Updated: February 4, 2016 00:22 IST2016-02-04T00:22:40+5:302016-02-04T00:22:40+5:30
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हा शाखेच्या वतीने माजी खासदार समीर भुजबळ यांच्या अटकेच्या विरूध्द तीव्र संताप व्यक्त करीत निदर्शने करण्यात आली.

समीर भुजबळ यांच्या अटकेचा निषेध
अमरावती : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हा शाखेच्या वतीने माजी खासदार समीर भुजबळ यांच्या अटकेच्या विरूध्द तीव्र संताप व्यक्त करीत निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांना निवेदन देण्यात आले.
माजी खासदार तथा समता परिषदेचे नेते समीर भुजबळ व कुटुंबीयांना बदनाम करण्याचे पडयंत्र अंमलबजावणी संचालनालयाचे वतीने रचण्यात आले आल्याचा आरोप महात्मा फुले समता परिषदने केला आहे. शासकीय दबावाने या संचालनालयाने राजकीय आकसाला बळी पडून माजी खासदार समीर भुजबळ यांना तडकाफडकी अटक केली. या विरोधात समता परिषदेने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्यपाल यांना निवेदन पाठवून कारवाई थांबविण्याची मागणी केली आहे.
यावेळी समता परीषदोचे विभागीय अध्यक्ष बाबूराव बेलसरे, प्रदेश सचिव गणेश खारकर, जिल्हाध्यक्ष किरण सोनार, उपाध्यक्ष सुनील वासनकर, युवा आघाडी अध्यक्ष राजेश अडगोकार, अंजली सारडे, राजश्री जढाळे, ज्योती बावीस्कर, अरूणा खारकर, प्रितम लांडे, नरेंद्र मोहोड, विश्र्वनाथ कविटकर, विठ्ठल इंगोले, दिनेश रहाटे, सुयश श्रीखंडे, प्रकाश लोखंडे व पदाधिकारी उपस्थित होते.