सावित्रीबाईंच्या पुण्याईमुळेच महिलांची प्रगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:11 IST2021-01-04T04:11:37+5:302021-01-04T04:11:37+5:30

प्रगती विद्यालयात कार्यक्रम (अर्धा कॉलम फोटो) अमरावती : एक स्त्री म्हणून आपण आई सावित्रीबाई यांचे सदैव ऋणी आहोत. त्यांनी ...

The progress of women is due to the virtue of Savitribai | सावित्रीबाईंच्या पुण्याईमुळेच महिलांची प्रगती

सावित्रीबाईंच्या पुण्याईमुळेच महिलांची प्रगती

प्रगती विद्यालयात कार्यक्रम (अर्धा कॉलम फोटो)

अमरावती : एक स्त्री म्हणून आपण आई सावित्रीबाई यांचे सदैव ऋणी आहोत. त्यांनी त्याकाळी दाखविलेल्या धाडसामुळेच आज कोट्यवधी भारतीय स्त्रियांना शिक्षणाची द्वारे खुली झाली व त्यांच्यामुळेच विविध क्षेत्रात स्त्रियांना आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविता आल्याचे खासदार नवनीत राणा म्हणाल्यात.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रविवारी हमालपुरा येथील प्रगती विद्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्यांच्याहस्ते विद्यालयाचे आधारस्तंभ सप्रे गुरुजी यांचे पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाला गोविंद कासट, गणेश खारकर, संगीता शिंदे, देशपांडे, जितू दुधाने, चंदा लांडे, अजय बोबडे, सचिन सोनवणे, मंगेश कोकाटे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी डहाणे, किरण तवर, स्वाती येळने, पाजणकर आदींनी सहकार्य केले.

Web Title: The progress of women is due to the virtue of Savitribai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.