८८ ग्रापंसाठी मतदार यादीचा कार्यक्रम

By Admin | Updated: April 9, 2017 00:03 IST2017-04-09T00:03:53+5:302017-04-09T00:03:53+5:30

जिल्ह्यात जून ते सप्टेंबरदरम्यान मुदत संपणाऱ्या व रिक्त पदे असणाऱ्या ८८ ग्रामपंचायतींच्या ११४ रिक्त सदस्यपदांच्या निवडणुकीसाठी आयोगाची लगबग सुरू आहे.

Program of voter list for 88 villages | ८८ ग्रापंसाठी मतदार यादीचा कार्यक्रम

८८ ग्रापंसाठी मतदार यादीचा कार्यक्रम

आयोगाचे आदेश : ११४ पदे, १०८ प्रभागांत निवडणुकांची लगबग
अमरावती : जिल्ह्यात जून ते सप्टेंबरदरम्यान मुदत संपणाऱ्या व रिक्त पदे असणाऱ्या ८८ ग्रामपंचायतींच्या ११४ रिक्त सदस्यपदांच्या निवडणुकीसाठी आयोगाची लगबग सुरू आहे. याठिकाणी मतदार यादीचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला आहे. २४ एप्रिल रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.
यामध्ये चांदूररेल्वे तालुक्यात बग्गी, कळमजापूर, पाथरगाव, निमगव्हाण, अचलपूर तालुक्यात निमदरी, बेलखेडा, पिंपळखुटा, निमकुंड, बोरगाव पेठ, बळेगाव, रामापूर, वरूड तालुक्यात जरूड, डवरगाव, गणेशपूर, लोणी, आमनेर, काटी, सावंगी, इसापूर, आलोडा, चांदूरबाजार तालुक्यात गोविंदपूर, खरपी कल्होडी, मासोद, मिर्झापूर, तळणीपूर्णा, रतनपूर, देऊरवाडा, जालनापूर, थूगाव, भातकुली तालुक्यात बैलमारखेडा, हातखेडा, टाकरखेडा संभू, वायगाव, उत्तमसरा, खोलापूर, निरूळगंगामाई, बोरखडी खुर्द, आष्टी, तिवसा तालुक्यात सार्सी, अमरावती तालुक्यात बोरगाव धर्माळे, कुंड सर्जापूर, पुजदा, सालोरा, सावंगा, सावर्डी, टेंभा, वलगाव, मोर्शी तालुक्यात मायवाडी, गोराळा, बेलोना, शिरूर, भाईपूर, उतखेड, शिरलस, हिवरखेड, खानापूर, चिखलदरा तालुक्यात काकादरी,हतरू, रूईपठार, रायपूर, माखला, खिरपाणी, सोमठाणा, अढाव, आमझरी, टेंब्रुसोंडा, सोनापूर, धारणी तालुक्यात बिरोटी, सावलीखेडा, नांदुरी, खाऱ्याटेंभरू, चटवाबोळ, कुटंगा, कारादा, दादरा, हिराबंबई, सुसर्दा, काटकुंभ, दर्यापूर तालुक्यात कळासी, कळमगव्हाण व नांदगाव खंडेश्वर तालुक्यात फुलआमला, मांजरी म्हसला, कोदोरी, सातरगाव, अडगाव व भगुरा येथील रिक्त सदस्यपदांसाठी हा कार्यक्रम आयोगाने लावला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Program of voter list for 88 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.