अमरावतीत प्राध्यापकाची आत्महत्या; नोट मिळाली, सस्पेन्स कायम!

By प्रदीप भाकरे | Published: March 20, 2023 06:44 PM2023-03-20T18:44:01+5:302023-03-20T18:44:19+5:30

अमरावती - न्यू राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयातील अधिष्टाता प्रा. डॉ. मनीष मोतीसिंह बैस (५२) यांच्या आत्महत्येचे गुढ अद्यापही उलगडलेले ...

Professor's Suicide; Got the note, the suspense continues! | अमरावतीत प्राध्यापकाची आत्महत्या; नोट मिळाली, सस्पेन्स कायम!

अमरावतीत प्राध्यापकाची आत्महत्या; नोट मिळाली, सस्पेन्स कायम!

googlenewsNext

अमरावती - न्यू राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयातील अधिष्टाता प्रा. डॉ. मनीष मोतीसिंह बैस (५२) यांच्या आत्महत्येचे गुढ अद्यापही उलगडलेले नाही. याप्रकरणी, गाडगेनगर पोलिसांनी रविवारी उशिरा रात्री आकस्मिक मृत्युची नोंद घेतली. तर घटनास्थळाहून दोन स्वतंत्र पानावर लिहिलेली सुसाईड नोट जप्त केली. त्यातील एक नोट मुलाच्या नावे, तर दुसऱ्या पानावरील मजकूर हा त्यांच्याच कॉलेजमधील एका जेष्ट सहकाऱ्यावर दोषारोपण करणारा असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. सुसाईड नोट जप्तीनंतरही बैस यांच्या आत्महत्येमागील कारण स्पष्ट झालेले नाही.

कॅम्प भागातील वृंदावन कॉलनी येथील घरात बैस यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला होता. रविवारी रात्री ९ च्या सुमारास ती घटना उघड झाल्यानंतर गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले व एसीपी प्रशांत राजे यांनी घटनास्थळ गाठले होते. पंचनामा करून त्यांचा मृतदेह शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आला. तर घटनास्थळी आढळलेल्या दोन पानी सुसाईड नोटवरून चौकशीला वेग देण्यात आला. वडिल फोन कॉल रिसिव्ह करीत नसल्याने बैस यांच्या मुंबईला उच्चशिक्षण घेत असलेल्या मुलाने त्याच्या एका स्थानिक मित्राला वृंदावन कॉलनीतील घरी पाठविले होते. तो मित्र पोहोचल्यानंतर प्रा. बैस यांच्या आत्महत्येची घटना उघड झाली होती.

काय आहे सुसाईड नोटमध्ये

सीपी नवीनचंद्र रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बैस यांच्या घरातून दोन पानी सुसाईड नोट जप्त करण्यात आली. त्यातील पहिल्या पानावरील मजकुर हा उच्चशिक्षित तरूण मुलाच्या नावे असून, त्यात आपली सर्व संपत्ती त्याच्याच शिक्षणावर खर्च करावी, असे नमूद करत त्याची माफीही मागण्यात आली आहे. तर दुसऱ्या पानावरील मजकुर न्यू राम मेघे कॉलेजमधील बैस यांच्या एका जेष्ट सहकाऱ्याच्या नावे आहे. त्या सहकाऱ्याचा मानसिक त्रास आपल्या सहनशक्तीपलिकडे गेल्याचे बैस यांनी सुसाईड नोटमध्ये नमूद केल्याची माहिती सीपींसह एसीपी प्रशांत राजे यांनी दिली.

दोन घरी होते वास्तव्य

पोलिसांनुसार, मनीष बैस यांचे दोन लग्न झाले होते. प्रशांतनगर येथे त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे घर होते. तर वृंदावन कॉलनीतील घर त्यांच्या स्वमालकीचे होते. त्यांनी रविवारी वृंदावन कॉलनीतील घरी आत्मघात करवून घेतला. कौटुंबिक वाद, आर्थिक व्यवहार व कॉलेजमधील सहकाऱ्याकडून होणारे मानसिक खच्चिकरण अशा वेगवेगळ्या बाबी त्यांच्या सुसाईड नोटमधून उघड झाल्या असल्या तरी खरे कारण त्यांच्या कौटुंबिक सदस्यांच्या बयानानंतर उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

Web Title: Professor's Suicide; Got the note, the suspense continues!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.