महिला नायब तहसीलदारांची कार्यवाही
By Admin | Updated: July 8, 2016 00:09 IST2016-07-08T00:09:54+5:302016-07-08T00:09:54+5:30
नव्यानेच पदोन्नतीप्राप्त महिला निवासी नायब तहसीलदार निर्मला सावलकर यांनी पदभार सांभाळताच मंगळवारी ५ जुलै रोजी गौण खनिजांची तस्करी करणारे चार ट्रॅक्टर....

महिला नायब तहसीलदारांची कार्यवाही
एकाच दिवशी चार ट्रॅक्टर पकडले : गौण खनिज तस्करांचे धाबे दणाणले
धारणी : नव्यानेच पदोन्नतीप्राप्त महिला निवासी नायब तहसीलदार निर्मला सावलकर यांनी पदभार सांभाळताच मंगळवारी ५ जुलै रोजी गौण खनिजांची तस्करी करणारे चार ट्रॅक्टर एकाचवेळी पकडून केलेल्या धाडसी कारवाईमुळे तस्करांचे धाबे दणाणले. या कारवाईचे महसूल विभागात स्वागत करीत असनू पर्यावरणप्रेमी जनतेकडून अभिननदन करण्यात येत आहे.
निर्मला सावलकर हे तहसील कार्यालयातच संजय गांधी कार्यालयात अव्वल कारकून म्हणून कार्यरत होत्या. त्यांची मागील आठवड्यातच नायब तहसीलदार पदावर बढती झाली होती. त्यांची कर्तव्यदक्षता पाहून त्यांना निवासी नायब तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आले.
सावलकर यांनी मंडळ अधिकारी कास्देकर यांच्यासह तलाठी संतोष व आरुळकर यांना घेऊन सर्वप्रथम भोकरबर्डीजवळील आमनेर किल्ला गडगा नदी पात्रात धाड टाकले. तिथे भोकरबर्डी येथील विजय मालवीय यांचे ट्रॅक्टर क्रमांक एम.पी. १०/ एए ३२०० आणि धुळघाट गडगा येथील निरज मालवीय यांचे ट्रॅक्टर क्रमांक एम.पी.१२/एसी - ११४१ रेतीची अवैध वाहतूक करीत असतानाचे पकडले. त्यांचेकडे रॉयल्टीवर खोडतोड करण्यात आल्याचे दिसून आले.
त्याचप्रमाणे बेरदा भुरू या मार्गावर कळमखार येथील जितेंद्र राठोड यांचे ट्रॅक्टर क्रमांक एम.पी.१२/एबी-९३५२ व अशोक मावस्कर यांचे ट्रॅक्टर क्रमांक एम.पी./६८ -ए/६३६ यात अवैधरीत्या मुरुमाची वाहतूक करताना सावलकर आणि त्यांच्या चमुने पकडून तहसील कार्यालयात आणले. या सर्व ट्रॅक्टरवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येत असून प्रकरण उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार असल्याचे तहसीलदार संतोष कणसे यांनी माहिती दिली. महिला नायब तहसीलदाराने केलेल्या या धाडसी कारवाईचा धसका गौण खनिज तस्करांनी घेतली आहे. (तालुका प्रतिनिधी)