समस्यांवर कायमस्वरुपी तोडगा हवा
By Admin | Updated: July 18, 2016 01:17 IST2016-07-18T01:17:12+5:302016-07-18T01:17:12+5:30
शहरातील जुनीवस्ती व नवीन वसाहतीमधील रहिवाशी मुलभूत सुविधांपासून वंचीत आहेत.

समस्यांवर कायमस्वरुपी तोडगा हवा
शासनाला निवेदन : माजी सभापतींची मागणी
चांदूररेल्वे : शहरातील जुनीवस्ती व नवीन वसाहतीमधील रहिवाशी मुलभूत सुविधांपासून वंचीत आहेत. नगरपालिकेच्या भोंगळ कारभाराने त्यांच्या समस्यांमध्ये वाढ होत आहेत. त्या अनुषंगाने शहरातील समस्यांवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यात यावा, असे निवेदन चांदूररेल्वे नगरपरिषदेचे माजी सभापती पंजाबराव मेटे यांनी शासनाकडे पाठविले आहे.
डहाणेवाडी, विश्वकर्मावाडी या परिसरातील पाणी गावातून वाहत येवून नालीद्वारे गावाबाहेर जाते. यावर कायमस्वरुपी बंदोबस्त करण्यात आला नाही. हाजी कासम आॅईल मील जवळील नाला, खरबडे लेआऊट ते मेटे कॉलनीपर्यंतचे रस्ते, काही नाल्यावर बांधकामे होऊन नाले अरुंद होणे, लिटील स्टार शाळेकडे जाणारा रस्ता, त्या शाळेभोवती पाण्याचे तलावाचे स्वरुप, सध्या नळाद्वारे गढूळ पाणी येणे, पाण्याचे शुद्धीकरणाकडे दुर्लक्ष, उघड्यावर संडास करणाऱ्यावर प्रतिबंद या समस्याचे नगरपरिषदेच्या प्रशासनाने प्रबोधन करून दहा दिवसात निकाली काढण्यात याव्या, या बाबतीत आजपर्यंत न. प. प्रशासनाने डोळेझाक केली असल्याचा आरोप निवेदनाद्वारे केला आहे. नगरपरिषदेत हद्दीतील नागरिकांना अद्यापर्यंत सुयोग्य मुलभूत सुविधा मिळाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. (तालुका प्रतिनिधी)