सेवानिवृत्त महसूल कर्मचारी अधिकाऱ्यांनी मांडल्या समस्या
By Admin | Updated: May 27, 2015 00:16 IST2015-05-27T00:16:56+5:302015-05-27T00:16:56+5:30
महसूल विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी, अधिकाऱ्यांनी प्रशासकीय स्तरावर प्रलंबित असलेल्या समस्यांची गाऱ्हाणी ....

सेवानिवृत्त महसूल कर्मचारी अधिकाऱ्यांनी मांडल्या समस्या
जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा : प्रलंबित प्रश्न सोडवा
अमरावती : महसूल विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी, अधिकाऱ्यांनी प्रशासकीय स्तरावर प्रलंबित असलेल्या समस्यांची गाऱ्हाणी मंगळवारी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या समोर मांडलीत.
सेवा निवृत्त महसुल कर्मचारी, अधिकारी बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हास्तरावर प्रलंबित असलेले प्रश्न, समस्या, सेवा निवृत्तीची प्रकरणे, प्रवासभत्ता आदी प्रश्न त्वरित निकाली काढावीत, अशी मागणी जिल्हाधिकारी गित्ते यांच्याकडे केली आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सेवानिवृत्त महसूल कर्मचारी व अधिकारी यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्या शक्य तितक्या लवकर निकाली काढण्याचे आश्वासन याप्रसंगी त्यांनी दिले. निवेदन देतेवेळी अध्यक्ष वीरेंद्र दीक्षित, सचिव एम. एस. गाडगे, जावरकर, कन्नाटे, वामन मरकोल्हे, देशमुख, नांदणे, पवार, देशपांडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)