झुकलेल्या विद्युत खांबामुळे अपघाताची शक्यता
By Admin | Updated: August 20, 2016 00:10 IST2016-08-20T00:10:48+5:302016-08-20T00:10:48+5:30
तिवसा तालुक्यातील सुलतानपूर नमस्कारी मार्गावरी ३ विद्युत पोल (खांब) झुकलेले आहेत.

झुकलेल्या विद्युत खांबामुळे अपघाताची शक्यता
तिवसा वीज वितरणचे बेपर्वा धोरण : विद्युत खांब तातडीने उभे करण्याची मागणी
तिवसा : तिवसा तालुक्यातील सुलतानपूर नमस्कारी मार्गावरी ३ विद्युत पोल (खांब) झुकलेले आहेत. त्यापैकी एक खांब कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या मार्गावर आहे. एका काठीचे आधारावर हा विद्युत खांब असल्याने अपघाताला आमंत्रण देत आहे. तिवसा विद्युत कंपनी मात्र याबद्दल उदासीन असून कुंभकर्णी झोपेत असलेली विद्युत कंपनी नागरिकांचे जिवावर उठली आहे.
तालुक्यातील सुलतान नमस्कारी या मार्गावर गावात विद्युत वाहन करणारे तीन खांब पार झुकले आहे. अगदी ये-जा करणाऱ्या वाहनांची वर्दळीचे मार्गावरच रोडवर ते खांब झुकले आहे. एक खांब एका लाकडी काठीच्या आधारावर असून कोणत्याही क्षणी पोल पडल्यास जिवंत वीज तारेच्या स्पर्शाने नागरिकांचा जीव जाऊ शकतो. तरीदेखील याला व्यवस्थित करण्याचे धाडस तिवसा वीज कंपनीने दाखवले असल्याने लोकांच्या जिवावर महावितरण उठली असून या मार्गावर नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करीत आहेत.
बेपर्वा असलेल्या वीज वितरण कंपनीला केव्हा जाग येईल, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. अपघात झाल्यास वीज कंपनीच याला दोषी राहील. या झुकलेल्या खांबाला सरळ उभे करून लोकांचे प्राण वाचवण्याची मागणी ममदापूर ग्रामपंचायत सदस्य मुंकुद पुनसे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)