‘प्रियदर्शनी’ बीओटीधारकांवर कारवाईचे संकेत
By Admin | Updated: December 16, 2015 00:10 IST2015-12-16T00:10:53+5:302015-12-16T00:10:53+5:30
स्थानिक जयस्तंभ चौकालगत महापालिका प्रशासनाने बीओटी तत्त्वावर साकारलेल्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी संकुलात गौडबंगाल असल्याचे सिध्द झाले आहे.

‘प्रियदर्शनी’ बीओटीधारकांवर कारवाईचे संकेत
संकुलात गौडबंगाल : विधिज्ञांच्या सल्ल्यानंतर ठरेल दिशा
अमरावती : स्थानिक जयस्तंभ चौकालगत महापालिका प्रशासनाने बीओटी तत्त्वावर साकारलेल्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी संकुलात गौडबंगाल असल्याचे सिध्द झाले आहे. याप्रकरणी बीओटीधारकांवर विधिज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कारवाईचे संकेत आहेत. हे फाईल आयुक्तांच्या दरबारात असून यात कोणत्या स्वरुपाची कारवाई होते, याक डे नजरा लागल्या आहेत.
महापालिकेने इंदिरा गांधी प्रियदर्शनी व्यापारी संकुल बीओटीवर साकारण्याचा करार वासू खेमचंदानी यांच्याशी केला होता. हा करार संपण्यास दोन वर्षांचा अवधी आहे. मात्र, महापालिका बाजार व परवाना विभागाने करवसुलीची मोहीम सुरू केली असता या संकुलातील ६३ गाळे या बीओटीधारकांनी रेकॉर्डवर रिक्त दाखविले होते. त्यामुळे या रिक्त ६३ गाळ्यांचा शोध घेतला असता हे गाळे बीओटीधारकांनी परस्पर अन्य व्यक्तिला विकल्याचे दिसून आले. बीओटीधारकाने गाळ्यांबाबत व्यवहार केल्याची माहिती महापालिका प्रशासनाला देणे अनिवार्य आहे. परंतु त्याने असे कोणतेही सौजन्य दाखविले नाही. दरम्यान या संकु लाचे बांधकाम नियमानुसार आहे अथवा नाही, याची चाचपणी करण्यासाठी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी एडीटीपी विभागाकडून मंजूर नकाशाप्रमाणे तपासणी केली होती. त्यामध्ये गैरप्रकार आढळून आल्याने आता कारवाईचे संकेत आहेत.