एसटीच्या ‘रातराणीसह’खासगी ट्रॅव्हल्सही रिकाम्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:16 IST2021-06-16T04:16:44+5:302021-06-16T04:16:44+5:30

निर्बंधामुळे रातराणीच्या फेऱ्या नाही, प्रवाशांचा अल्प प्रतिसाद अमरावती : जिल्हा अनलॉक झाला असला तरी निर्बंधात पाहिजे त्या प्रमाणात सूट ...

Private travels with ST's 'Ratrani' are also empty! | एसटीच्या ‘रातराणीसह’खासगी ट्रॅव्हल्सही रिकाम्या !

एसटीच्या ‘रातराणीसह’खासगी ट्रॅव्हल्सही रिकाम्या !

निर्बंधामुळे रातराणीच्या फेऱ्या नाही, प्रवाशांचा अल्प प्रतिसाद

अमरावती : जिल्हा अनलॉक झाला असला तरी निर्बंधात पाहिजे त्या प्रमाणात सूट मिळालेली नाही. त्यामुळे एसटी महामंडळाकडून रातराणीवर व रात्री सोडण्यात येणाऱ्या बसफेऱ्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. दैनंदिन फेऱ्यांची संख्या वाढली असून, शिवशाही बस मात्र, बोटावर मोजण्या इतक्याच गाड्या रस्त्यावर धावत आहेत.

या बस सोबत खासगी बसलाही प्रवाशांचा कमी प्रतिसाद मिळत आहे. काेरोना निर्बंधात सूट मिळाल्याने एसटी महामंडळाची प्रवासी वाहतूक पूर्ववत होत आहे. एक जूनपासून अत्यावश्यक सेवेसाठी बससेवा सुरू करण्यात आली. काही शहरात फेऱ्या पूर्ववत करण्यात आल्या आहेत. हळूहळू निर्बंध आणखी शिथिल होत असल्याने फेऱ्यांची संख्या वाढत आहे. या बसला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. सद्यस्थितीत मध्यवर्ती बस स्थानकासह अन्य मिळून ८ आगारांतून दररोज २०० बसेसच्या ५७५ फेऱ्या सुरू आहेत. यात ५ शिवशाही बसेसचा समावेश असून यामध्ये नागपूर, यवतमाळ, अकोला, पतरवाडा, वरूड यासारख्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. शनिवार व रविवार प्रवाशांचा प्रतिसाद कमी प्रमाणात असतो. उर्वरित दिवसाला समाधानकारक प्रतिसाद मिळत आहे. दररोज जवळपास ६३ हजार किलोमीटर बस धावत असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले. खासगी बसला मात्र अपेक्षित प्रवासी मिळत नाहीत.

बॉक्स

एसटी आगारात किती फेऱ्या सुरू आहेत. ५७५

शिवशाही किती

४५

वाहक - ८६०

चालक-८००

बॉक्स

नागपूर, यवतमाळ, अकोला, परवाडा मार्गावर गर्दी

एसटी महामंडळाने १ जूनपासून अमरावती मध्यवर्ती बसस्थानकानसह अन्य आगारातून नागरपूर, यवतमाळ, अकोला, परतवाडा, वरूड मार्गावर प्रवासी संख्याही वाढली आहे. या मार्गावर लालपरी सोबत शिवशाही बस सोडण्यात येत आहे. या मार्गावरील बसेसला चांगला प्रतिसाद मिळत असून त्यांची संख्या वाढविण्यात आली आहे.

बॉक्स

अद्याप ट्रॅव्हल्स नेहमीप्रमाणे सुरू नाहीत!

कोरोनामुळे एसटी महामंडळास सोबत खाजगी बसच्या व्यवसाय मोठा परिणाम झाला आहे. बहुतांश खासगी बस मालकांनी बस सेवा बंद ठेवली आहे. प्रवासी नसल्याने बस चालविणे अवघड झाले आहे.

निर्बध शिथिल झाले आहेत. परंतु एसटी बस सोबत खासगी बसेसलाही प्रवाशांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. बहुतांश खासगी बस अजून उभ्या आहेत. प्रवाशांनी कोरोनाची धास्ती घेतली आहे.

३) खासगी बसचे तिकीट जास्त असले तरी बहुतांश प्रवासी लांबच्या प्रवासाला या बसला प्राधान्य देतात. शहरातून पुणे नागपूर, औरंगाबाद, इंदोर या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी खाजगी बस फेऱ्या करतात.

४)निर्बंधात सूट मिळताच पूर्ण क्षमतेने खासगी बसेस सुरू करण्यात येणार असल्याचे एका कंपनीच्या मालकाने सांगितले. तसेच प्रवाशांच्या प्रतिसादावर अवलंबून असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

कोट

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर निर्बंधातही सूट देण्यात आली आहे. सध्या २०० बसेस धावत आहेत. मात्र, रात्रराणी गाड्या तूर्तास बंद असून निर्बंधात पूर्ण शिथिलता मिळाल्यानंतर व प्रवाशांचा प्रतिसाद पाहून बसेस सोडल्या जातील.

- श्रीकांत गभणे,

विभाग नियंत्रक

Web Title: Private travels with ST's 'Ratrani' are also empty!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.