महामार्गावर धावती खासगी ट्रॅव्हल्स पेटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 00:35 IST2018-01-28T00:35:32+5:302018-01-28T00:35:54+5:30
नजीकच्या वाय पॉइंटसमोर औरंगाबादहून नागपूरकडे जाणारी धावती ट्रॅव्हल्स पेटली. तथापि, चालकाने वाहन पेट घ्यायच्या आत सर्व प्रवाशांना बाहेर काढले. काही वेळातच गाडीची राखरांगोळी झाली.

महामार्गावर धावती खासगी ट्रॅव्हल्स पेटली
बडनेरा : नजीकच्या वाय पॉइंटसमोर औरंगाबादहून नागपूरकडे जाणारी धावती ट्रॅव्हल्स पेटली. तथापि, चालकाने वाहन पेट घ्यायच्या आत सर्व प्रवाशांना बाहेर काढले. काही वेळातच गाडीची राखरांगोळी झाली. ही घटना शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता घडली.
औरंगाबादहून नागपूरकडे निघालेली एमएच ३८ एफ २५९९ क्रमांकाची ट्रॅव्हल्स बडनेरापासून नजीकच्या महामार्गावरील वाय पॉइंटजवळ पोहोचताच चालक प्रभाकर भाऊराव शिंदे (४५, रा. औरंगाबाद) यांना साईड ग्लासमध्ये मागील बाजूने धूर निघत असलेला दिसला. चालकाने लगेच ट्रॅव्हल्स थांबविली. पहाटे साडेचार वाजताची घटना असल्याने ३० प्रवासी झोपेत होते. चालकासह वाहक नंदकिशोर गावनेर यांनी सर्व प्रवाशांना उतरविले. अग्निशमन बंब पोहचण्यापूर्वीच ट्रॅव्हल्स जळून खाक झाली. बडनेरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. ट्रॅव्हल्स नॉन एसी असल्याचे समजते.