खासगी रुग्णालयांचे ऑडिट झाले; रुग्णांना पैसे परत केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 05:00 AM2021-06-10T05:00:00+5:302021-06-10T05:00:30+5:30

मार्च ते सप्टेंबर २०२० या दरम्यान खासगी रुग्णालयांनी कोरोना रुग्ण अथवा नातेवाईकांकडून अव्वाच्या सव्वा अतिरिक्त देयके वसूल करण्यात आले होते. परिणामी ऑडिट करण्यासाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी चार लेखापालांची समिती नेमली होती. त्याअनुषंगाने २६०० रुग्णांचे बिल तपासण्यात आले. या पथकाने शहरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांची लूट केल्याचा ठपका ठेवला आणि १.३० कोटी रुपये जास्तीचे वसूल केले.

Private hospitals were audited; When to return money to patients? | खासगी रुग्णालयांचे ऑडिट झाले; रुग्णांना पैसे परत केव्हा?

खासगी रुग्णालयांचे ऑडिट झाले; रुग्णांना पैसे परत केव्हा?

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकारी पथकाचा अहवाल, मनपा आयुक्तांकडे डॉक्टरांकडून पैसे वसुलीची जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरातील आठ खासगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांकडून आगाऊ बिल आकारल्याप्रकरणी जिल्हाधिकारी यांच्याद्धारा गठित ऑडिट पथकाने १.३० कोटी रूपये रुग्णांना परत करण्याबाबतचा अहवाल महापालिका आयुक्तांना दिला. मात्र, आतापर्यंत केवळ खासगी रुग्णालयांना पैसे वसुलीसाठी नोटीस बजावण्यात आली. पण, रुग्णांना पैसे परत कधी मिळणार, हा प्रश्न कायम आहे.
मार्च ते सप्टेंबर २०२० या दरम्यान खासगी रुग्णालयांनी कोरोना रुग्ण अथवा नातेवाईकांकडून अव्वाच्या सव्वा अतिरिक्त देयके वसूल करण्यात आले होते. परिणामी ऑडिट करण्यासाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी चार लेखापालांची समिती नेमली होती. त्याअनुषंगाने २६०० रुग्णांचे बिल तपासण्यात आले. या पथकाने शहरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांची लूट केल्याचा ठपका ठेवला आणि १.३० कोटी रुपये जास्तीचे वसूल केले. ते रुग्णांना परत करण्याबाबतचा अहवाल सादर करण्यात आला आहे. मात्र, महापालिका प्रशासनाकडून खासगी रुग्णांलयांच्या डॉक्टरांना पैसे वसूल करण्यासाठी नोटीस बजावली. पुढे काहीच नाही, अशी स्थिती आहे. 

३० जूनपर्यंत पैसे परत करण्याची डेडलाईन
जिल्हाधिकारीद्धारा गठित पथकाने दिलेल्या अहवालात १.३० कोटी रुपये खासगी हॉस्पिलटच्या डॉक्टरांकडून वसूल करून ते रुग्ण अथवा नातेवाईकांना ३० जूनपर्यंत परत करणे अपेक्षित असल्याचे मत नोंदविले. महापालिका प्रशासनाकडून कारवाई अपेक्षित आहे. खासगी डॉक्टरांना नोटीस बजावली असली तरी सक्ती केली जात नाही.

कोरोना रुग़्णांकडून जास्तीचे पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने खासगी कोविड रुग्णालयांचे ऑडिटसाठी चार पथक नेमले होते.  या पथकाने अहवाल सादर केला असून, आता खासगी रुग्णालयांकडून ही रक्कम वसूल करून ती रुग्ण अथवा नातेवाईंकांना देणे अपेक्षित आहे. शहरातील एकूण आठ रुग्णांलयाची नावे समाविष्ठ आहेत.
- शैलेश नवाल, 
जिल्हाधिकारी.

 

Web Title: Private hospitals were audited; When to return money to patients?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.