परतवाड्यात खासगी दवाखान्याची तोडफोड

By Admin | Updated: September 25, 2016 00:25 IST2016-09-25T00:25:02+5:302016-09-25T00:25:02+5:30

आजारी बाळाला उपचारासाठी खासगी दवाखान्यात नेल्यावर परिचारिकेसोबत वाद झाल्याने संतप्त पालकाने तोडफोड केल्याचा प्रकार

Private dispensary in the backyard | परतवाड्यात खासगी दवाखान्याची तोडफोड

परतवाड्यात खासगी दवाखान्याची तोडफोड

गुन्हा दाखल : डॉक्टरांची तातडीची बैठक, पोलिसांना निवेदन
परतवाडा : आजारी बाळाला उपचारासाठी खासगी दवाखान्यात नेल्यावर परिचारिकेसोबत वाद झाल्याने संतप्त पालकाने तोडफोड केल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री ११.३० वाजता येथील श्रीकृष्ण बालरुग्णालयात घडला. परतवाडा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
येथील टिळक चौकात श्रीकृष्ण घुटे यांचे बालरुग्णालय आहे. शुक्रवारी रात्री गोविंदनगर कांडली येथील मुकेश वर्मा यांच्या बाळाला उलटी आणि हागवण लागल्याने त्यांनी बाळाला दवाखान्यात आणले. दवाखान्यात उपस्थित परिचारिकेने वर्मा यांना डॉ.श्रीकृष्ण घुटे घरी असून इमरजन्सी फी ३०० रुपये भरा किंवा सरकारी दवाखान्यात न्या, असा सल्ला दिला. त्यावर दोघांमध्ये वाद झाला. बाळ आजारी असताना अतिरिक्त शुल्क घेत असल्याच्या कारणावरून मुकेश वर्मा यांचा संताप अनावर झाला.
दवाखान्यातील काचा फोडून त्यांनी खुर्च्या फेकल्या. श्रीकृष्ण रघुनाथ घुटे यांच्या फिर्यादीवरून परतवाडा पोलिसांनी अश्लील शिवीगाळ, धमकी देत सामानाची नासधूस केल्याचा गुन्हा दाखल केला. दवाखान्यात पोहोचल्यावर पुन्हा डॉक्टर घुटे व वर्मा यांच्यात वाद झाला.
या घटनेनंतर शहरातील इंडियन मेडिकल असोशिएशनच्या सर्व डॉक्टरांनी शनिवारी तत्काळ बैठक घेतली. अध्यक्ष मोहन केवाळे, सचिव देवेंद्र अग्रवाल, राजेश उभाड, हर्षराज डफडे, प्रभू जवंजाळ, भन्साली, राम ठाकरे, इंद्रनिल ठाकरे, मो. जाकीर, स्वनिल अग्रवाल, गौरव गवई, आर. एम. कानुनगो, अमोल चित्रकार, मंगल राठी, प्रिती काबरा, स्वाती उभाड, मोनाली मानकर, स्मिता चित्रकार, तपन रावत, अमोल ढाकुलकर, वैभव बरडीया, अरूणा गुल्हाने, शरद राठी, नितीन मानकर, अभिजीत कर, संदीपदुधे आदी डॉक्टरांनी पोलिसांना शनिवारी सायंकाळी निवेदन देऊन आरोपीला अटक करून कारवाईची मागणी केली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Private dispensary in the backyard