पंचवटी चौकात पुन्हा खासगी बसचा शिरकाव, वाहतूक विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 06:00 IST2020-01-05T06:00:00+5:302020-01-05T06:00:30+5:30

काही वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस आयुक्तांनी अधिसूचना काढून खासगी बसेसकरिता वेलकम पॉर्इंटची जागा निश्चित केली होती. नागपूर राष्ट्रीय मार्गावरील वेलकम पॉर्इंटजवळ वाहने पार्किंग करावी, कुठलीही बसेस यऊ देता कामा नये, अन्यथा कारवाई करण्यात येईल, अशा कडक सूचना खासगी बस मालकांना पोलिसांनी दिल्या होत्या.

 Private bus again in Panchavati Chowk, traffic disrupted | पंचवटी चौकात पुन्हा खासगी बसचा शिरकाव, वाहतूक विस्कळीत

पंचवटी चौकात पुन्हा खासगी बसचा शिरकाव, वाहतूक विस्कळीत

ठळक मुद्देनागरिक त्रस्त । अपघाताची भीती, खासगी बस मालकांना पोलिसांचे अभय का?

संदीप मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वेलकम पॉर्इंटजवळ खासगी बसेसला थांबा व पार्किंगची व्यवस्था केली असतानाही अनेक कंपनींच्या खासगी बसेस शहरात शिरून वाहतुकीला अडथळा निर्माण करत आहेत. त्यामुळे पंचवटी चौकात नेहमीच वाहतुककोंडी होत असल्याने अशा बसेसमुळे नागरिकांनासुद्धा त्रास सहन करावा लागत आहेत.
काही वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस आयुक्तांनी अधिसूचना काढून खासगी बसेसकरिता वेलकम पॉर्इंटची जागा निश्चित केली होती. नागपूर राष्ट्रीय मार्गावरील वेलकम पॉर्इंटजवळ वाहने पार्किंग करावी, कुठलीही बसेस यऊ देता कामा नये, अन्यथा कारवाई करण्यात येईल, अशा कडक सूचना खासगी बस मालकांना पोलिसांनी दिल्या होत्या. मात्र, त्याकडे लक्झरी बसेस चालक, मालकांनी दुर्लक्ष करीत राजरोसपणे पंचवटी चौकात खासगी बसेचा ठिय्या दिसून येत आहे. सकाळी व सायंकाळी तेथून प्रवाशी वाहतूक होत आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. पंचवटी चौकात पेट्रोलपंपालगत सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने नालीचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे तेथे येणारे नागरिक आपली वाहने रस्त्यावरच पार्किंग करतात. त्याचवेळी खासगी बसेसमध्येसुद्धा तेथून प्रवासी बसमध्ये बसविले जातात. त्यामुळे वर्दळ वाढून वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. दिवसातून अनेकदा येथे अशा प्रकारे वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे येथे किरकोळ अपघाताच्या घटनासुद्धा घडल्या आहेत. येथेच एसटी महामंडळाच्या बसचाही थांबा असल्याने दिवसभर शेकडो प्रवासी पंचवटी चौकात इतरत्र प्रवास करण्यासाठी याच ठिकाणावरून बसमध्ये बसतात. त्यातच खासगी बसेसचा वावर वाढल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. मात्र, याकडे पोेलिसांचे व आरटीओच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. सदर खासगी बसमालक चालकांना अभय का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. शहरात शिरणाºया खासगी बसेसना पायबंद घालावा व नियमबाह्य बसमध्ये पंचवटी चौकातूनच प्रवासी वाहतून होत असेल तर त्यांच्यावर कारवार्इंचा बडगा उगारावा, अशी मागणी होत आहे.

रोज ५० बसेस पुण्याकरिता
नागपूर व अमरावतीहून पुण्याकडे जाण्याकरिता अमरावतीतून रोज २५ विविध खासगी कंपनीच्या ५० पेक्षा अधिक बसेस अमरावती येथून पुणे सुटतात. त्यामध्ये अनेक बसेस पंचवटीतून येतात. पंचवटी चौकातच सात ते आठ टिकीट बुकींग कार्यालयेसुद्धा आहेत. त्यामुळे काही प्रवाशांना पंचवटी चौकातूनच सेवा दिली जाते, हा प्रकार नियमबाह्य आहे. याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष वेधणे गरजेचे आहे.

गर्दीच्या ठिकाणी बसेस उभ्या केल्या जात असतील तर त्या बसचालकांवर कारवाई करण्याचा अधिकार वाहतूक पोलिसांना आहे. टपावर माल भरून वाहतूक केली जात असेल व परमीट नसेल, तर आरटीओ कारवाई करतील.
रामभाऊ गिते, प्रादेशिक परिवहन अधिकारी, अमरावती

खासगी बसेसना पंचवटी चौकात बंदी घातलेली आहे. अशा प्रकारच्या बसेस त्या ठिकाणी उभ्या राहत असतील किंवा पार्किंगमध्ये बसेस लावल्या जात असतील तर निश्चितच कारवाई केली जाईल.
- मनीष ठाकरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गाडगेनगर

Web Title:  Private bus again in Panchavati Chowk, traffic disrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.