शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
2
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
3
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
4
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
5
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
6
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
7
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
8
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
9
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
10
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
11
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
12
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
13
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
14
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
15
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
16
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
17
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
18
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
19
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
20
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!

गांधी जयंतीनिमित्त कैद्यांना मिळणार शिक्षेत सूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 9:42 PM

केंद्र सरकारने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून देशभरातील कारागृहांतील कैद्यांच्या शिक्षेत सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देगृहविभागाचा पुढाकारतीन टप्प्यांत लाभ देण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी

गणेश वासनिक ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्र सरकारने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून देशभरातील कारागृहांतील कैद्यांच्या शिक्षेत सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने राज्याच्या गृहविभागाने बंदीवानांच्या शिक्षेत सूट देण्यासंदर्भात प्रस्ताव मागविले आहेत. तीन टप्प्यांत कैद्यांना याचा लाभ मिळणार आहे.२ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम, उपक्रम आयोजित आहेत. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार राज्याच्या गृहविभागाने मध्यवर्ती व जिल्हा कारागृहांमध्ये विविध गुन्ह्यांखाली जेरबंद असलेल्या कैद्यांच्या शिक्षेत विशेष सूट देण्यासंदर्भात अटी-शर्र्तीनुसार प्रस्ताव मागविले आहेत. कैद्याची कारागृहातील वागणूक, गुन्ह्याचे स्वरूप, पॅरोलवर सुटका, सुटी घेतल्यानंतर कारागृहात परतणे, आदी महत्त्वाच्या बाबी तपासूनच प्रस्ताव पाठविण्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.कैद्यांना शिक्षेत सूट देण्यासाठी तीन टप्पे पाडले आहेत. यात पहिला टप्पा २ आॅक्टोबर २०१८, दुसरा टप्पा ६ एप्रिल २०१९, तर तिसरा टप्पा २ आॅक्टोबर २०१९ असा निश्चित केला आहे. पात्र कैद्यांची यादी कारागृह अधीक्षकांना शासनाकडे पाठवावी लागणार आहे. शिक्षेत सूट मंजूर करण्यासाठी राज्य शासनाने समिती नेमली आहे. गृहविभागाचे अपर मुख्य सचिव, विधी व न्याय विभागाचे अपर मुख्य सचिव, कारागृह विभागाचे महानिरिक्षक आणि विशेष महानिरीक्षकांचा यात समावेश असणार आहे.

या कैद्यांना मिळणार सूट५० टक्के शिक्षा पूर्ण झालेल्या ५५ वर्षानंतरच्या महिला कैदी, ६० वर्षानंतरचे पुरुष कैदी, ७० टक्के अपंगत्व असलेले दिव्यांग यांना सूट मिळेल. लिंग परिवर्तित कैदी असल्यास ५५ वर्षांची अट राहील.

हे कैदी अपात्रफाशीची शिक्षा, जन्मठेपेचे कैदी, ताडा, पोटा, यूएपीए, रासुका, गैरकायदेशीर कारवाया, हुंडाबळी, बनावट नोटा, पोक्सोे, अंमली पदार्थ प्रतिबंधक कृत्याखाली शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना सूट मिळणार नाही.गृहविभागाकडून मार्गदर्शक तत्त्वे बुधवारी प्राप्त झाली. त्यानुसार कैद्यांचे प्रस्ताव पाठविले जातील. अटी-शर्तींच्या अनुषंगाने कैद्यांच्या नावांची छाननी सुरू झाली आहे. येत्या आठवड्यात प्रस्ताव पाठविले जातील.- रमेश कांबळे, अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह अमरावती

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी