पंतप्रधानांना लाखो विद्यार्थी ऐकणार
By Admin | Updated: September 4, 2014 23:27 IST2014-09-04T23:27:32+5:302014-09-04T23:27:32+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्या ५ सप्टेंबर रोजी शिक्षकदिनाचे औचित्य साधून खास विद्यार्थ्यासाठी भाषण होणार आहे. या कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण जिल्हयातील २ हजार ८०५ शाळांमधील सुमारे ५ लाख ५० हजार

पंतप्रधानांना लाखो विद्यार्थी ऐकणार
तयारी पूर्ण : २८०५ शाळांमध्ये होणार थेट प्रसारण
अमरावती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्या ५ सप्टेंबर रोजी शिक्षकदिनाचे औचित्य साधून खास विद्यार्थ्यासाठी भाषण होणार आहे. या कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण जिल्हयातील २ हजार ८०५ शाळांमधील सुमारे ५ लाख ५० हजार विद्यार्थी या संवाद कार्यक्रमांचे लाभ घेणार आहेत
शुक्रवारी ५ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी खास देशातील विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत. त्यासाठी केंद्रीय शिक्षण सचिवांनी पत्र लिहून पंतप्रधानांचे भाषण विद्यार्थ्यांना ऐकता यावे यासाठी तयारी करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्ह्यातील शासकीय आणी खाजगी अशा २ हजार ८०५ शाळा यासाठी सज्ज झाल्या आहेत . यामध्ये जिल्हा परीषदेच्या एक हजार ६०२ शाळांचा समावेश आहे.शासकीय ,खाजगी, अनुदानित शाळा अशा सर्वच शाळामधील ५लाख ५० हजार विद्यार्थी या संवाद कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यासाठी टीव्हीपासून ते आसन व्यवस्था , वीजपुरवठयाची सुविधा नसल्यास जनरेटरची व्यवस्था विद्यार्थ्यानसाठी जिल्हयातील सर्वच शाळांनी तयारी पूर्ण केलीआहे. दुपारी ३ ते ४.४५ या वेळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभरातील सर्वच शाळांमधील विद्यार्थ्यानसाठी खास मार्गदर्शन करणार आहेत . यासाठी मागील काही दिवसापासून जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग व सर्व शाळांचे मुख्याध्यापक तयारीच्या कामात व्यस्त होते. आता या कार्यक्रमाला काही तासाचा अवधी शिल्लक असतांना यासाठी शाळा सज्ज झाल्या आहेत.