पंतप्रधान मोदींचा विद्यार्थी संवाद, शाळांची तयारी सुरू
By Admin | Updated: September 4, 2015 00:34 IST2015-09-04T00:34:30+5:302015-09-04T00:34:30+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी शिक्षक दिनानिमित्त शहर व जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

पंतप्रधान मोदींचा विद्यार्थी संवाद, शाळांची तयारी सुरू
शिक्षक दिनाचे औचित्य : पाऊण तासाचा उपक्रम
अमरावती : पंतप्रधान नरेंद्र मोदी शिक्षक दिनानिमित्त शहर व जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधानांचे विचार ऐकण्यासाठी शाळेत रेडीओ, दूरदर्शन, इंटरनेटची सोय करण्यात आलेली आहे. ४ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते ११.४५ या यावेळेत कार्यक्रम होणार आहे. विविध शाळेत कार्यक्रमाची तयारी सुरू झाली आहे.
गतवर्षी फक्त ठराविक शाळांना दिल्लीत पाचारण करण्यात आले होते. यंदा विभागानुसार एका विद्यार्थ्याला दिल्ली येथे लाईव्ह कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे. विभागातून एका विद्यार्थ्याची निवड केली जाणार आहे. एनआयसी सेंटरच्या माध्यमातून पंतप्रधान सगळ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचे दूरदर्शन व मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या संकेत स्थळावर थेट वेबकास्टींग होणार आहे. जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये हा कार्यक्रम पाहता यावी, यासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्यात येणार आहे. बहुतांश शाळेत वीज जोडणीसह दूरदर्शन संच उपलब्ध करण्यात आले आहेत. काही कारणास्तव ज्या शाळांमध्ये वीज, दूरदर्शन, टीव्ही, सिग्नल केबल किंवा अॅन्टीनाची सोय नसेल तर प्रशासन स्तरावर करावी लागणार आहे.