सहा महिन्यांत ३५४४ गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:11 IST2021-07-08T04:11:05+5:302021-07-08T04:11:05+5:30
अमरावती : गुन्हेगारांवर आळा बसवा, याकरीता त्यांचा इतिहास तपासून गत सहा महिन्यांत ३५४४ सक्रिय गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई पोलीस आयुक्त ...

सहा महिन्यांत ३५४४ गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई
अमरावती : गुन्हेगारांवर आळा बसवा, याकरीता त्यांचा इतिहास तपासून गत सहा महिन्यांत ३५४४ सक्रिय गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी केली. आगामी सण उत्सव व महानगरपालिका निवडणुकीदरम्यान गुन्हेगारांवर पोलीस आयुक्तांचा वॉच असणार आहे. सक्रिय गुन्हेगारांवर तडीपार, एमपीडीए अंतर्गत प्रतिबंधक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.
सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना सक्रिय गुन्हेगारांचा पूर्वेतिहास तपासून गुन्हेगारांवर आळा बसावा, या उद्देशाने गुन्हेगारांवर कारवाईचे निर्देश पोलीस आयुक्तांनी दिले आहे. त्यानुसार २०२० मध्ये जूनपर्यंत सहा महिन्यांत २०६५ सक्रिय गुन्हेगारांवर कारवाई केली होती. आता २०२१ मध्ये सहा महिन्यात जूनपर्यंत ३५४४ गुन्हेगारांवर प्रतिबंध कारवाई केल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.