अटक टाळण्यासाठी आरोपीने मारली पुलावरून उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 14:37 IST2017-07-21T14:36:57+5:302017-07-21T14:37:34+5:30
अमरावतीकडून अकोल्याकडे बैलांची कत्तलीसाठी अवैध वाहतूक करणाऱ्या मालवाहक वाहनास विशेष पथकाने काटेपुर्णा गावाजवळील पुलावर अडविलं होतं

अटक टाळण्यासाठी आरोपीने मारली पुलावरून उडी
ऑनलाइन लोकमत
बोरगांव मंजू, दि. 21- अमरावतीकडून अकोल्याकडे बैलांची कत्तलीसाठी अवैध वाहतूक करणाऱ्या मालवाहक वाहनास विशेष पथकाने काटेपुर्णा गावाजवळील पुलावर अडविलं होतं. पथकाच्या या कारवाईच्या वेळी वाहनातील एका आरोपीने अटक टाळण्यासाठी पुलावरून खाली उडी मारल्याची घटना २१ जुलै रोजी घडली . यामुळे सदर आरोपी गंभीर जखमी झाला आहे.
बोरगावमंजू पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या काटेपूर्णा येथे अमरावतीकडून १६ बैल कोंबून भरून कत्तलीसाठी अकोल्यास आणण्यात येत असल्याची माहिती पोलिसांच्या विशेष पथकाला शुक्रवारी सकाळी मिळाली. त्या माहितीवरून विशेष पथकाने वाहनास अडवून ताब्यात घेतले असता वाहनातील एक आरोपी पोलिसांच्या तावडीतून पसार झाला. दुसरा आरोपी असलेला वाहन चालक समीर खान वैद खान याने पोलिसांकडून केली जाणारी अटक टाळण्यासाठी चक्क काटेपूर्णा येथे पुलावरुन खाली उडी मारली. त्यामुळे सदर आरोपी गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले असून तेथे त्याच्यावर उपचार करण्यात येत आहे. या कारवाईत विशेष पथकाने सोळा बैलांना जीवदान दिले आहे.