सीबीआयचा अधिकारी असल्याची बतावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 06:01 IST2019-11-03T06:00:00+5:302019-11-03T06:01:00+5:30

शहरातील शीतल गॅस एजन्सीचे कर्मचारी असलेले रवींद्र निवृत्ती टापरे (रा. थिलोरी) हे २ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास स्टेट बँकेत २ लाख ४६ हजार ८८० रुपयांचा भरणा करण्यासाठी गेले होते. बँकेत जाण्याआधी लोखंडी गेटजवळ दोन अज्ञात इसमांनी त्यांना आवाज दिला. त्यापैकी एक इसम टापरे यांच्याजवळ आला. आम्ही सीबीआयचे अधिकारी आहोत.

Pretending to be a CBI officer | सीबीआयचा अधिकारी असल्याची बतावणी

सीबीआयचा अधिकारी असल्याची बतावणी

ठळक मुद्दे५० हजार रोख लंपास । स्टेट बँकसमोरच लुबाडले

लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करून एका कर्मचाऱ्याकडून ५० हजार रुपये लंपास करण्यात आले. शनिवारी सकाळी ११.३० च्या सुमारास स्थानिक स्टेट बँकेसमोर ही घटना घडली. याप्रकरणी दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील शीतल गॅस एजन्सीचे कर्मचारी असलेले रवींद्र निवृत्ती टापरे (रा. थिलोरी) हे २ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास स्टेट बँकेत २ लाख ४६ हजार ८८० रुपयांचा भरणा करण्यासाठी गेले होते. बँकेत जाण्याआधी लोखंडी गेटजवळ दोन अज्ञात इसमांनी त्यांना आवाज दिला. त्यापैकी एक इसम टापरे यांच्याजवळ आला. आम्ही सीबीआयचे अधिकारी आहोत. तुमच्या हातात असलेल्या स्कूल बॅगची झडती घ्यायची आहे, असे म्हणून टापरे यांना पैसे बाहेर काढायला सांगितले. बॅगमध्ये काही घातक पदार्थ आहेत का, नोटा बनावट आहेत का, अशी विचारणा करीत त्या बॅगेतून पाचशे रुपयांच्या नोटांचे दोन बंडल बाहेर काढले. त्यानंतर आणखी शंभर रुपयांच्या नोटांचे दोन बंडल बाहेर काढले. तपासणी झाल्याचे सांगत आता तुम्ही जाऊ शकता, असे बजावल्यानंतर टापरे हे बँकेत गेले. त्यावेळी ५० हजार रुपये कमी भरल्याने फसवणुकीचा प्रकार उघड झाला. त्यांनी लागलीच बँकेबाहेर येऊन पाहिले असता ते दोन्ही तोतया तेथून रफूचक्कर झाले होते. पोलिसांनी भादंविचे कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

पद्धत बदलली
पैसे मोजून देणे, अंगावर घाण फेकणे, पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांना लुटल्याच्या घटना शहरात घडल्या आहेत. मात्र, सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी पहिल्यांदाच शहरात उघड झाली आहे.

Web Title: Pretending to be a CBI officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.