अवैध व्यवसायाला चाप; ३०० आरोपींच्या मुसक्या आवळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:10 IST2021-07-08T04:10:44+5:302021-07-08T04:10:44+5:30

सीपींचा फोटो घेणे अमरावती : पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी स्थापन केलेल्या विशेष पथकाने सहा महिन्यात ३०० आरोपींच्या मुसक्या ...

Pressure on illegal business; 300 accused were caught red-handed | अवैध व्यवसायाला चाप; ३०० आरोपींच्या मुसक्या आवळल्या

अवैध व्यवसायाला चाप; ३०० आरोपींच्या मुसक्या आवळल्या

सीपींचा फोटो घेणे

अमरावती : पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी स्थापन केलेल्या विशेष पथकाने सहा महिन्यात ३०० आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून तब्बल १ कोटी ३३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरती सिंह यांनी अमरावती शहराचा कार्यभार स्वीकारताच त्यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये एका विशेष पथकाची स्थापना केली. याद्वारा शहरातील दारू, जुगार, गांजा, गुटखा, रेती, गोवंश, अवैध गॅस रिफिलिंग तसेच इतर अवैध धंद्यावर वेळोवेळी कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यांच्या आदेशाप्रमाणे विशेष पथकातील सहायक पोलीस निरीक्षक पंकज चक्रे, तथा सूरज चव्हाण, राजिक, सूरज मेश्राम, निखिल गेडाम यांनी गुप्त माहितीच्या आधारे सहा महिन्यांच्या काळात कारवाई करून अवैध धंद्यावर अंकुश मिळविला.

बॉक्स

शीर्षक केसेस आरोपी जप्त मुद्देमाल

जुगार : ३६, १२८, ९,३२,०२८ रु

दारू ९४, १२१ : ५४,८६,४८२

गांजा २ , ४ : ३७३५२० रुपये

रेती वाहतूक १६, १७ : २,३४,००० रुपये

हुक्का पार्लर १, २ : १८७३० रुपये

गुटखा २, २ : १५३३३१६ रुपये

गॅस रिफिलिंग ६, ९ : ११७४००० रुपये

गोवंश ३, १० : २३, ३६, ००० रुपये

रेमडेसिविर इंजेक्शन काळा बाजार १, ७, १५,१४०००)

एकूण १६१, ३०० : १,३३,६८०७७

Web Title: Pressure on illegal business; 300 accused were caught red-handed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.