प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशनला आठ दिवसांत हक्काची जागा
By Admin | Updated: October 9, 2015 01:00 IST2015-10-09T01:00:12+5:302015-10-09T01:00:12+5:30
अमरावती प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशनद्वारा आयोजित विदर्भस्तरीय छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनीच्या बक्षीस वितरण समारंभानिमित्त ....

प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशनला आठ दिवसांत हक्काची जागा
अमरावती : अमरावती प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशनद्वारा आयोजित विदर्भस्तरीय छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनीच्या बक्षीस वितरण समारंभानिमित्त प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशनला हक्काची जागा येत्या आठ दिवसांत उपलब्ध करून देणार असल्याचे अभिवचन महापालिका पदाधिकाऱ्यांसह मान्यवरांनी दिले.
येथील सांस्कृतिक भवनात विदर्भस्तरीय छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनी बुधवारी झाली. प्रदर्शनीला विदर्भातील मान्यवरांनी भेटी दिल्यात. बक्षीस वितरण समारंभाला आ. रवी राणा, स्थायी समितीचे सभापती विलास इंगोले, काँग्रेसचे गटनेता बबलू शेखावत, नगरसेवक सुनील काळे, किशोर बोरकर, नितीन धांडे आदींच्या हस्ते स्पर्धेचे बक्षिस वितरण करण्यात आले. पुढील वर्षी छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनी प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशनच्या स्वत:ताच्या जागेत व्हावे अशी इच्छा मान्यवरांनी व्यक्त केली. त्यामुळे येत्या आठ दिवसात आयुक्तांसोबत बैठक घेऊन जागा निश्चित करण्याचे आश्वासन आ. रवि राणा यांनी दिले. स्पर्धेचे बक्षिस वितरण समारंभाचे प्रास्तविक मनीष जगताप यांनी केले. स्वागतपर भाषण किशोर बोरकर यांनी केले.