अध्यक्ष वानखडे, उपाध्यक्षपदी खडसे
By Admin | Updated: November 4, 2015 00:08 IST2015-11-04T00:08:41+5:302015-11-04T00:08:41+5:30
येथील डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को-आॅपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी संजय वानखडे तर उपाध्यक्षपदी संजय खडसे यांची अविरोध निवड करण्यात आली.

अध्यक्ष वानखडे, उपाध्यक्षपदी खडसे
पंजाबराव बँक निवडणूक : बिनविरोध निवड
अमरावती : येथील डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को-आॅपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी संजय वानखडे तर उपाध्यक्षपदी संजय खडसे यांची अविरोध निवड करण्यात आली. ही निवडणूक जिल्हा उपनिबंधक (सहकार) गौतम वालदे यांच्या मार्गदर्शनात मंगळवारी पार पडली.
इर्विन चौकातील डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को-आॅपरेटिव्ह बँकेच्या मुख्य सभागृहात निवडणूक घेण्यात आली. मागील आठवड्यात संजय वानखडे यांच्या नेतृत्वातील परिवर्तन पॅनेलचे सर्वच १७ संचालक निवडून आले होते.